PM Narendra Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचेही आभार मानले. जनतेने आभार व्यक्त करण्याची संधी दिली. म्हणून जनतेचं आभार मानतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सरकारने 40 लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले असं सागंत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांची आकडेवारी जाहीर केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
बचत भी, विकास भी अशी आमची काम करण्याची पद्धत आहे. जन धन, आधार ही जैन त्रिमूर्ती निर्माण केली, जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला. डीबीटीद्वारे 40 लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले. आयकरात सवलत देऊन मध्यमवर्गीयांची देखील मोठी बचत करण्यात आली आहे. पूर्वी 2 लाखांवर देखील आयकर आकारला जायचा. आता आम्ही 12 लाखाचे उत्पन्न करमुक्त केले आहे. सरकारी कार्यालयातील भंगार विकून 2 हजार कोटी रुपये मिळवले. दहा वर्षाता कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही.
आम्ही सत्तेत येण्यापूर्वीच एलईडी बल्ब तब्बल 400 रुपयांना विकले जायचे. आम्ही प्रयत्न करून त्याच्या किमती 40 रुपयांवर आणल्या. यामुळे देशातील ऊर्जेची बचत झाली. 20 कोटी रुपयांची बचत झाली. गेली कित्येक वर्षे वृत्तपत्रांचे मथळे घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी व्यापलेले असायचे. परंतु, गत 10 वर्षांमध्ये आम्ही कोट्यावधी रुपयांची बचत केली. तो पैसा थेट जनतेच्या कल्याणासाठी खर्च केला. देशाचा पैसा वाचवण्यासाठी अनेक योजना आणल्या. सरकारी योजनांच्या माध्यमातून आम्ही सरकारचा भरपूर पैसा वाचवला. परंतु, त्या पैशांनी आम्ही शीष महाल बांधलेले नाहीत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर लगावला आहे.
अनेक खासदारांनी आपले विचार मांडले. साहजिकच काही नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा उमटल्या. महाकुंभपासून चीनवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या. विकसित भारतासाठी नव्याने विश्वास व्यक्त केला. 21 वं शतक 25% टक्के समाप्त होत आहे. हे शतक भारताचंच असणार आहे. यासाठी जमिनी स्तरावर बदल पाहायला मिळत आहे.
देशातील जनतेने मला 14 वेळा येथे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. पाच दशकांपर्यंत फक्त गरिबी हटवण्याचे नारे ऐकले. आता 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडले आहेत. योजनांचे योग्य नियोजन करुन अगदी सन्मानपूर्वक यांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. आम्ही गरिबांना खोटी आश्वासने दिली तर त्यांना विकासाच्या मार्गावर आणले. आम्ही गरिबांच्या समस्या आणि मध्यमवर्गीयांची समस्या जाणून घेतल्या. अशा लोकांना मदत करण्यासाठी मनात जिद्द असावी लागते. मात्र, काही लोकांमध्ये अशी जिद्द नव्हती असा टोला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला.
गरिबांना 4 कोटी घरं मिळाले. ज्यांनी आयुष्य जगलं आहे त्यांना पक्क्या घराची किंमत कळेल. एक महिला उघड्यावर शौच्छास जाण्यास जाताना पहाटे उजाडण्याआधा जाते. रोजचे नित्यक्रम करताना देखील अडचणीचा सामना करावा लागतो. आम्ही महिलांची अडचण समजून लाखो शौचालये बांधली. देशात 16 कोटींपेक्षा अधिक घरात पाण्याचे नळ नव्हते. 12 कोटी घरांमध्ये नळाद्वारे जल योजना आणली. काही लोक गरिबांच्या घरात जाऊन फक्त फोटो काढतात असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.