शिवाली परबचा तो सीन अन् दिग्दर्शिकेने जोडले हात, अभिनेत्रीने शेअर केला BTS व्हिडीओ

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकताच तिच्या मंगला चित्रपटातील एका सीनचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 5, 2025, 02:59 PM IST
शिवाली परबचा तो सीन अन् दिग्दर्शिकेने जोडले हात, अभिनेत्रीने शेअर केला BTS व्हिडीओ title=

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमीच तिच्या हटके आणि विनोदी भूमिकांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. याच कार्यक्रमातून अभिनेत्रीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच आता शिवाली परबचा सत्य घटनेवर आधारित असलेला 'मंगला' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये गायिकेची भूमिका ही शिवाली परब हिने साकारली आहे. 

दरम्यान, शिवाली परबने 'मंगला' चित्रपटातील एका सीनचा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये शिवालीने या चित्रपटाच्या पडद्यामागच्या काही गोष्टी देखील शेअर केल्या आहेत. ज्यामधील अभिनेत्रीच्या भूमिकेचं चाहत्यांनी आणि दिग्गज कलाकारांनी देखील खूप कौतुक केलं आहे. 

अभिनेत्रीने शेअर केला BTS व्हिडीओ  

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या 'मंगला' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता अभिनेत्रीने या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाली गाताना दिसत आहे. शिवाली परबला हा सीन फक्त एका श्वासात करायचा होता आणि अभिनेत्रीने तो उत्कृष्टरित्या शूट केला. हा सीन शूट होताच चित्रपटाच्या दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग यांनी येऊन शिवाली परब समोर हात जोडले. त्यासोबतच तिचे कौतुक देखील केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटलं की, BTS … एक वेगळाच अनुभव , मंगला हे पात्र मला खूप काही शिकवून गेलं. या चित्रपटाच्या निमित्ताने मला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि काम करायला मज्जा आली. ही जी बंधिश आहे ती फार कठीण होती आणि चॅलेंजिंग होती. नाक बंद असल्यामुळे श्वास घेणं थोडं कठीण होतं. यात एका श्वासात बराच वेळ गायन करायचं होतं. हे शूट करतना खूप मज्जा आली म्हणून आज हा व्हिडीओ तुमच्या सोबत शेअर करत आहे. 

त्यासोबतच अभिनेत्रीने विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतानाचा देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचे BTS व्हिडीओ प्रचंड चर्चेत आले आहे.