'पुढचे 5 दिवस भेटता येणार नाही' डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर धनंजय मुंडेचे आवाहन!

Dhananjay Munde:  धनंजय मुंडे यांनी आपण पुढील 5 दिवस विश्रांती घेत असल्याचे आवाहन केले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 5, 2025, 01:50 PM IST
'पुढचे 5 दिवस भेटता येणार नाही' डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर धनंजय मुंडेचे आवाहन! title=
धनंजय मुंडे

Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर वाल्मिक कराडसर इतर 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना वाल्मिक कराड्यच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसताय. गेले 58 दिवस आपल्या मीडीया ट्रायल सुरु असून मला राजकारणातून संपवण्याचा टक असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपण पुढील 5 दिवस विश्रांती घेत असल्याचे आवाहन केले आहे. 

काय म्हणाले धनंजय मुंडे?   

माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने सर यांच्या खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील 4 ते 5 दिवस काळजी आणि विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल, असे धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 

नामदेवशास्त्रींनी दिला पाठींबा 

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जात महंत नामदेवशास्त्रींची भेट घेतली होती. आणि तत्काळ नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबाही जाहिर केला होता. नामदावशास्त्रींच्या पाठिंब्यानंतर शास्त्रींच्या भूमिकेवर राज्यभरातून जोरदार टीका झाली. नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना समाजाचा पाठिंबा आणि सहानुभुती मिळवायची होती अशीही चर्चा राज्यभरात रंगली होती. ज्याच्यामागे जातीचं पाठबळ आहे त्याला कायदा हात लावत नाही अशी टीका संजय राऊतांनी चारच दिवसांपूर्वी केली होती. 

दमानियांच्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर  

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटं बोलणं याव्यतिरिक्त काही नाही असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ज्यावर आक्षेप घेतला ती संपूर्णपणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला साजेशी होती असंही त्यांनी सांगितलं आहे. 'एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे किती पैसे खातो याबाबत मी आज पुरावे देणार. DBT ही योजना सरकारने काढली होती. या योजनेचे पैसे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक GR काढण्यात आला होता, असे दमानिया म्हणाल्या. 12 एप्रिल 2018 रोजीचा जीआर मुख्यमंत्र्यांना ही जी 62 आयटम्सची लिस्ट आहे जे डीबीटी खाली येणार आहे. त्या 62 आइटमला अॅड करण्याची मुभा ही मुख्यमंत्र्यांना आली आणि म्हणजे यातून काही आइटम वगळू शकत नाही पण मुख्यमंत्री त्यात अॅड करू शकतात. जर यातील काही आइटम वगळायचे असतील तर एक कमिटी बनविण्यात आली होती, असे त्या पुढे म्हणाल्या.