Bhopal News Today: कलियुगात नात्यांचे महत्त्वदेखील हळूहळू होत जात आहे. भोपाळमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दोघा भावांमध्ये असलेल्या वादामुळं वडिलांच्या अत्यंसंस्कारावेळी एक हृदयद्रावक प्रसंग घडला आहे.
मध्य प्रदेशमधील टीकमगढ जिल्ह्यातील लिधौरा गावात हा प्रसंग घडला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही सख्या भावांमधील वाद इतका वाढला की वडिलांच्या मृतदेहाला अग्नी कोण देणार यावरुन दोघंही अडून बसले आहेत. वाद इतका विकोपाला गेला की मुलांनी वडिलांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्याचा विचार मांडला जेणेकरुन दोघंही वडिलांचे अत्यंसंस्कार करु शकतील.
दरम्यान, लिधौरा गावातील हा सर्व प्रकार आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही सख्ख्या भावांमध्ये वाद वाढला. त्यानंतर मोठ्या भावाने वडिलांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्याची मागणी केली. मात्र अत्यंसंस्काराला आलेल्या नातेवाईकांनी त्याला समजावून सांगितले. मात्र तरीही तो ऐकत नव्हता. अखेर नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचून अत्यंसंस्कारासाठी दोन्ही भावांना वाद सोडवण्यास मदत केली. तेव्हा वडिलांचे अत्यंसंस्कार करण्यात आले.
लिधौरा तालचे रहिवाशी ध्यानी सिंह घोष यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा अत्यंसंस्काराची संपूर्ण तयारी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत नातेवाईकदेखील तिथे पोहोचले आणि अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र दामोदरचा मोठा भाई किशन सिंह घोष त्याच्या मुलांसह आला आणि अत्यंसंस्कार करण्यावरुन हट्ट धरु लागला.
दामोगर याने मोठ्या भावाला अंत्यसंस्कार करण्यासाठी नाही म्हटलं. त्याचं म्हणणं होतं की तो वडिलांसोबत राहतो आणि त्यानेच त्यांची सेवा केली तर वडिलांचे अंत्यसंस्कारदेखील मीच करणार अशी त्याची भूमिका होती. यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. अखेर नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर दोघा भावांनी एकत्रितपणे अंत्यसंस्कार करावा, असं ग्रामस्थांनी म्हटलं मात्र मोठा भाऊ किशन याने नकार दिला.
किशनचे म्हणणे होते की वडिलांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात यावे, असा हट्ट धरला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण मिटवले आणि दोघा भावांनी एकत्रितपणे वडिलांवर अंत्यसंस्कार केले.