सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती. 

Intern | Updated: Feb 5, 2025, 12:26 PM IST
सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण title=

सारा अली खान, जी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर झपाट्याने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे, तिने 6 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'केदारनाथ', 'सिम्बा', 'लव्ह आज कल' आणि 'कुली नंबर 1' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ती आज एक स्वतःची ओळख बनवून यशस्वी अभिनेत्री बनली आहे. परंतु तिच्या पालकांच्या घटस्फोटाविषयी ती कित्येक वेळा गप्प राहिली होती. परंतु एका मुलाखतीत सारानी या संवेदनशील मुद्द्यावर खुलासा केला.

घटस्फोटानंतर काय बदललं? 

साराने 2021 मध्ये एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या आईवडिलांचा घटस्फोट होण्याआधीच ती ही जाणून गेली होती. सारा म्हणाली, "माझ्या वयाच्या 9 व्या वर्षीच मी पहिल्यांदा समजून घेतलं की आईवडील एकत्र राहूनही आनंदी नाहीत. माझ्या आईच्या चेहऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून हसू गायब झालं होतं." घटस्फोटानंतर तिच्या आईच्या चेहऱ्यावर परत हसू आले आणि ती आनंदी राहू लागली," 

सारा आणि तिच्या आईवडिलांमधील नातं

साराने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, "माझ्या आईच्या स्वभावात एक गोडपणा होता, पण काही काळापूर्वी तिचं हसणं थांबलं होतं. घटस्फोटानंतर ती पुन्हा आनंदी झाली आणि ती पुन्हा हसू लागली, माझ्या लहानपणापासून आई अधिक गंभीर दिसायची आणि त्यामुळे मी तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं उदासी पाहिलं होतं. पण आता तीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेचं जुने हसू परत आले आहे आणि हे पाहून मला एक प्रकारची मानसिक शांतता मिळाली.".

सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे 1991 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं झाली - सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. 2004 मध्ये, सैफ आणि अमृता यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या निर्णयानंतर, अमृता सिंगला मुलांचा ताबा मिळाला, पण सैफ अली खान मुलांच्या संगोपनात कुठेही कमी पडला नाही. सैफने मुलांना कधीही लांब नाही केले आणि म्हणूनच दोन्ही मुलं आजही सैफच्या जवळ राहतात. 

हे ही वाचा: आराध्या बच्चनवर वयाच्या 13 व्या वर्षी न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ, नेमकं काय आहे कारण...

सारा अली खानचा बॉलिवूडमधील प्रवास आणि आगामी प्रोजेक्ट्स

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये 2018 मध्ये 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केलं. या चित्रपटाने तिला मोठं यश मिळवलं. त्यानंतर, तिने 'सिम्बा', 'लव्ह आज कल', 'कुली नंबर 1' आणि 'अतरंगी रे' सारख्या हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला. साराची अभिनय क्षमता आणि तिचा आकर्षक व्यक्तिमत्त्व हे तिला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

तिचा आगामी चित्रपट 'मेट्रो इन दिनो' आहे, जो या वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. सारा या चित्रपटात नवीन रूपात दिसणार आहे आणि तिच्या चाहत्यांना तिच्या अभिनयाची एक वेगळीच बाजू पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, तिचा भाऊ इब्राहिम अली खान लवकरच 'नादानियां' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.