बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा प्रचंड चर्चेत आली आहे. ती सतत तिच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. अशातच सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील तिचं अलिशान 4 BHK अपार्टमेंट विकलं आहे. अभिनेत्रीने तिचे हे घर विकून तब्बल 61 टक्के नफा कमवला आहे. त्यामुळे सोनाक्षी सिन्हा सर्वत्र चर्चेत आली आहे.
स्क्वायर यार्ड्सने एका निवेदनाद्वारे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या खासगी मालमत्तेबद्दल सोमवारी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षीने वांद्रे पश्चिम एमजे शाह ग्रुप 81 ऑरिएट भागातील घर विकले आहे. हा प्रोजेक्ट 4.48 एकरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये 4 BHK घरं आहेत.सोनाक्षीच्या घराचा कार्पेट एरिया 391.2 वर्ग मीटर आणि बांधकाम असलेला परिसर 430.32 वर्ग मीटर इतका आहे. याच ठिकाणी सुनील शेट्टी, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांचे देखील घरं आहेत.
सोनाक्षी सिन्हाला झाला इतक्या कोटींचा फायदा
सोनाक्षीच्या मालमत्तेच्या नोंदणीच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, सोनाक्षी सिन्हाने मार्च 2020 मध्ये 14 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केले होते. जानेवारी 2025 मध्ये, ते 22.50 कोटी रुपयांना विकले आहे. ज्यामुळे तिला सुमारे 8.5 कोटी रुपयांचा नफा झाला. या करारामुळे किमतीत 61% वाढ झाली आहे. जी मुंबईच्या प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या व्यवहारात 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 1.35 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागले आहे.
अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती?
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये सोनाक्षी सिन्हाचे नाव येते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2023 मध्ये अभिनेत्रीने ज्या प्रोजेक्टमधील घर विकलं आहे, त्याच ठिकाणी आणखी एक घर विकत घेतले होते. हे घर तिने 11 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बाल या दोघांची मिळून एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांची आहे. ज्यामध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.