Devendra Fadnavis : आष्टी तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. बीड हा राष्ट्रावादीचा बालेकिल्ला आहे. धनंजय मुंडे यांचा बीडमध्ये दबदबा आहे. मात्र, आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड याच्यावर झालेल्या आरोपांमुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप झाले आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा चांगलाच चर्तेत आलाय. अशातच नविन बीड निर्माण करु असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसयांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपनं त्यांच्या पक्षाचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमण्यास सुरुवात केली आहे. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी ही संपर्कमंत्री नेमल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. बीड जिल्ह्याची सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना संपर्कमंत्री म्हणून नेमले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बीडचा दौरा केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. आधुनिक भगीरथ म्हणून आमदार सुरेश धस तालुक्यात ओळखले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात म्हणजेच काम मार्गी लागल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. या भागातील दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे. संपूर्ण परिसर हा बागायती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
संतोष देशमुख हत्ये सारखी घटना खपवून घेतली जाणार नाही. कुणीही असो कारवाई होईल. फक्त बीड च्या जनतेला विनंती आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आपण एकत्र राहू आपला दादीपमान इतिहास जपू. बीडचा जुना इतिहास पुन्हा जनतेसमोर आणला पाहिजे. नविन बीड निर्माण करु असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली ती सर्वांना आवडल्याचं, काही राजकारण्यांनी गुन्हेगारांना पाठिंबा दिल्यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाल्याची टीका त्यांनी केली. बीडमधील आष्टी इथल्या कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाषणात जोरदार फटकेबाजी केली.
2009 मध्ये ज्यांना पहिल्यांदा भाजपने गुलाल लावला आणि आताही भाजप च्या तिकिटावर आले. मी पालकमंत्री असताना कधी सुई सारखी घटना होऊ दिली नाही, कधीही जातपात केलं नाही. आम्ही गडावरून राजकारण करत नाही, लोक काय म्हणतात जाऊ द्या. इथं सगळी लोक मोठी झाले आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या.