ओडिशा : देशभरात रेल्वे अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे झालेल्या रेल्वे अपघातात मालगाडीचे १६ डब्बे रुळावरुन घसरले. नपगुंडी स्टेशनजवळ अलाहाबाद दरम्यान पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मालगाडीचे डब्बे एकमेकांवर चढले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
या रेल्वे अपघातानंतर रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली आहे. तथापि, या अपघातात सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. दरम्यान, मंगळवारी मोठा अपघात टळला. दुरांतो एक्स्प्रेस, हातिया-आनंद विहार एक्स्प्रेस आणि महोबोधी एक्स्प्रेस एकाच ट्रकवर आल्यात. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर मोठा अपघात टळला.
गेल्या काही दिवसांत अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. जम्मू-राजधानी एक्स्प्रेसचे मागील डब्बे १४ सप्टेंबरला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन खाली उतरले होते. तसेच ७ सप्टेंबरला शाक्तिपुंज एक्स्प्रेस, २९ ऑगस्टला दुरांतो एक्स्प्रेस, कलिंगा उत्कल एक्सप्रेस आणि २३ ऑगस्ट १९ ऑगस्ट रोजी कैफियात एक्सप्रेसला अपघात झाला होता.