देशातील २९ शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका

राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात.. राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.  यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत. 

Updated: Jul 31, 2017, 08:34 AM IST
देशातील २९ शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात.. राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.  यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत. 

अतितीव्र भूकंपप्रवण शहरांमध्ये नऊ राज्यांच्या राजधानीच्या शहरांचाही समावेश आहेत. दिल्ली, श्रीनगर, कोहिमा पुद्दुचेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहेराडून, इंफाळ आणि चंदीगडचा समावेश आहे. ही शहरं भूगर्भ हालाचींच्या तीव्रतेच्या आधारे पाडण्यात आलेल्या झोन नुसार चौथ्या आणि पाचव्या झोनमध्ये मोडतात...त्यामुळे या शहरांमध्ये भूकंप होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. 

या शहरांमध्ये मिळून एकूण तीन कोटी लोक वास्तव्याला आहेत हेही यानिमित्तानं महत्वाचं आहे. याशिवाय अतितीव्र भूकंपप्रवण झोनमध्ये गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारचा काही भाग, आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश होतोय. २००१मध्ये कच्छमधल्या भुजमध्ये झालेल्या भूकंपात अंदाजे २० हजार लोकांचा बळी गेला होता. या अहवालानुसार महाराष्ट्राचा काही भाग झोन ४मध्ये येतो.