धक्कादायक! रूग्णालयात ४९ मुलांचा हलगर्जीपणामुळे

 30 मुलांचा मृत्यू न्यू बॉर्न केअर युनिटच्या उपचारादरम्यान झाला आहे. 

Updated: Sep 4, 2017, 03:37 PM IST

फरुखाबाद : उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती फरुखाबादमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्यामुळे 49 मुलांचा मृत्यू झालाय. 

यातील 19 मुलांचा मृत्यू प्रसुती दरम्यान झाला आहे. तर 30 मुलांचा मृत्यू न्यू बॉर्न केअर युनिटच्या उपचारादरम्यान झाला आहे. 

या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने राम मनोहर लोहिया रुग्णालयाची चौकशी केली. त्यात हलगर्जीपणामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने गुन्हा नोंदवण्यात आलाय. या गुन्ह्याविरोधात रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलं आहे.