7th Pay Commission: ही बातमी वाचून तुम्ही सरकारी नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात कराल यात शंका नाही. कारण पुन्हा एकदा या सरकारी नोकरदार (Government Jobs) वर्गासाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. ज्याचा लाभ देशातील लाखो केंद्र (Sarkari Naukri) सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही बातमी आहे, अर्थातच पगारवाढीची. गेल्या काही काळापासून केंद्रातील विविध विभागांच्या सेवेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा फार काळ टीकणार नाही, कारण लवकरच या मंडळींना मोठी भेट मिळणार आहे. (7th Pay Commission Government Employees will get da Allowances latest Marathi news )
सूत्रांच्या माहितीनुसार (Dearness Allowance) महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच 42 टक्के DA मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळं त्यांच्या पगारात एकूण 90 हजार रुपयांनी वाढ होणार आहे.
दर महिन्याला महागाई भत्त्याची आकडेवारी श्रम ब्युरोकडून देण्यात येणाऱ्या उपभोक्ता मूल्य सूचकांक (CPI-IW) च्या आधारे निर्धारित केली जाते. त्यातच केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार डिसेंबर 2022 साठी CPI-IW 31 जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यामध्ये 4.23 टक्क्यांनी वाढ होत आहे.
7th Pay Commission च्या धर्तीवर समोर आलेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर समजा कोणा एका कर्मचाऱ्याचा पगार 30 हजार रुपये आहे, तर त्यांच्या Gross Salary मध्ये 10800 रुपयांनी वाढ होणार आहे. तर, सचिव स्तरावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 90 हजार किंवा त्याहूनही जास्त वाढ अपेक्षित आहे.
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन लाभार्थींना 1 जानेवारीपासूनचा महागाभ भत्ता मिळणार आहे. होळीच्या आधी, म्हणजेच साधारण पुढील (मार्च) महिन्यापासून पगाराची (Salary Hike) ही वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या बातम्या सातत्यानं समोर येत असल्यामुळं नेमकी ही पगारवाढ, भत्तेवाढ केव्हा निर्धारित केली जाते असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. तर, सहामाई समीक्षा पूर्ण झाल्यानंतर एसीआयपीआय क्रमांकांच्या आधारे महागाई भत्ता वर्षात दोनदा वाढतो. होळीच्या आधी भत्तेवाढ होते तर होळीनंतर खात्यात ही रक्कम जमा होते.
सध्याच्या घडीला महागाई भत्तेवाढीचा फायदा 68 लाख वरिष्ठ नागरिक आणि साधारण 47 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी वाढ केली होती. ज्यामुळं हे प्रमाण 38 टक्क्यांवर पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा भत्त्यांमध्ये वाढ झाल्यामुळं हे प्रमाण 41 ते 42 टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळं आता पगारवाढ नेमकी किती याची आकडेमोड सुरुच करा.