Viral Video: धबधब्याखाली Mahindra SUV नेली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण कारच....; चालकाला मिळाला आयुष्यभराचा धडा

Viral Video: डिजिटल क्रिएटर अरुण पनवारने (Arun Panwar) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने आपली Mahindra Scorpio N कार धबधब्याखाली नेली असता त्यातून पाणी गळण्यास सुरुवात होते. असं काही होईल याची कल्पना नसणाऱ्या अरुण पनवारला धक्का बसला असून आयुष्यात पुन्हा कधी सनरुफ कार (Sunroof Car) विकत न घेण्याची शपथ घेतली आहे.   

Updated: Feb 28, 2023, 01:40 PM IST
Viral Video: धबधब्याखाली Mahindra SUV नेली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण कारच....; चालकाला मिळाला आयुष्यभराचा धडा title=

Viral Video: सध्या कार विकत घ्यायची असेल तर सनरुफ (Sunroof Car) असणाऱ्या कारला पसंती दिली जाते. प्रवास करताना सनरुफमधून बाहेरचं दृश्य पाहून निसर्गाचा आनंद लुटणं प्रत्येकालाच आवडतं. पण अनेकदा एखादी सोय गैरसोयही ठरण्याची शक्यता असते. डिजिटल क्रिएटर असणाऱ्या अरुण पनवारला (Arun Panwar) असाच एक अनुभव आला आहे. अरुण पनवारने आपली कार धबधब्याखाली (Waterfall) नेली असता त्यातून पाणी गळू लागलं. अरुण पनवारला असं काही होईल याची कोणतीच कल्पन नसल्याने धक्काच बसतो. व्हिडीओत कार पूर्णपणे पाण्याने भरत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

अरुण पनवार फिरण्यासाठी डोंगर माथ्यावर गेला असता त्याने आपली Mahindra Scorpio N कार धुण्यासाठी धबधब्याखाली नेण्याचं ठरवलं. यानंतर कार धबधब्याखाली नेली जाते. कार पाण्याखाली नेण्याआधी चालक पाणी आत येऊ नये यासाठी सनरुफ बंद करतो. काही वेळातच कार धबधब्याखाली पार्क केली जाते. 

पण ज्या क्षणी धबधब्याचं पाणी कारच्या छतावर पडण्यास सुरुवात होते. सनरुफ आणि स्पीकरमधून पाणी कारमध्ये झिरपू लागतं. काही वेळातच संपूर्ण कार पाण्याने भरु लागते. यामुळे चालकालाही धक्का बसतो आणि 'ही काय मस्करी आहे' असं तो म्हणत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. 'अरे हे काय सुरु आहे' असंही तो म्हणत असल्याचं ऐकू येतं.

पाणी झिरपू लागल्यानंतर चालक लगेच आपली काढ धबध्याखालून काढून पुढे घेतो. यानंतर सनरुफ नीट बंद झालं होतं का? याचीही खातरजमा करुन घेतो. पण पाणी कारमध्ये शिरल्याने सीटसह इतर सर्व इंटिरिअर खराब होतं. हा व्हिडीओ शेअर करताना अरुण पनवारने 'आपण पुन्हा कधी सनरुफवाली गाडी घेणार नाही' अशी कॅप्शन देत शपथच घेतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arun Panwar (@arunpanwarx)

हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून बराच व्हायरल झाला आहे. 40 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामला पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून एका युजरने म्हणून मी कधीच महिंद्राची कार घेत नाही असं म्हटलं आहे. तर काहींनी अशाप्रकारे पाणी झिरपणं शक्य नसून जाणुनबुजून सनरुफ खुलं ठेवलं असावं अशी शक्यता वर्तवली आहे. तर एका युजरने कोणतंही सनरुफ वॉटरप्रूफ नसतं सांगत त्याचे कान उघडले आहेत. 

Scorpio-N गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच करण्यात आली होती. Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L अशा पाच व्हेरियंटमध्ये ही गाडी लाँच करण्यात आली होती.