आकाश अंबानीची लग्नपत्रिका पाहून थक्क व्हाल...

इटली विराट अनुष्काचा शाही विवाहसोहळा पार पडला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 13, 2017, 11:17 AM IST
आकाश अंबानीची लग्नपत्रिका पाहून थक्क व्हाल... title=

नवी दिल्ली : इटली विराट अनुष्काचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सर्वत्र त्यांचेचे वारे वाहू लागले आहेत. अगदी त्यांच्या ड्रेसपासून डेस्टिनेशन वेडिंगबद्दल सर्व बाबतीत विराट-अनुष्काचीच चर्चा होऊ लागली.

थक्क व्हाल...

मात्र याचदरम्यान आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या लहान मुलाच्या लग्नाचा विषय समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली त्याची लग्नपत्रिकेचा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

इतका असेल पत्रिकेचा खर्च

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंनुसार, आकाश अंबानीची लग्नपत्रिका छापून तयार आहे. या पत्रिकेची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीड लाख आहे. पत्रिका मोती व सोन्याने सजवण्यात आली आहे. ही किंमती पत्रिका फक्त 50 लोकांना पाठवण्यात येणार आहे. म्हणजे याचा एकूण खर्च 75 लाख असेल.

यात दुमत नाही...

आकाश अंबानीच्या लग्नाची पत्रिका समोर आली असली तरी लग्न नेमके कधी होणार हे कळलेले नाही. हे लग्न कधीही होऊदे. मात्र ते अत्यंत धुमधडाक्यात होईल. याबद्दल दुमत नाही.

आकाश अंबानीबद्दल...

नीता आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा असून तो रिलांयन्स जिओ टेलीकॉमचे चीफ ऑफ स्ट्रेटजी आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या एका सर्वेमध्ये या कंपनीचे नेट वर्थ 2.2 लाख करोड आहे.