छोटा शकीलचा एकुलता एक मुलगा आध्यात्माच्या वाटेवर...

दाऊदच्या मुलगा देखील याच वाटेवर 

Updated: Aug 27, 2018, 08:15 AM IST
छोटा शकीलचा एकुलता एक मुलगा आध्यात्माच्या वाटेवर...  title=

मुंबई : फरार माफिया डॉन दाऊद इब्राहिम कास्करचा मुलगा मौलाना बनला असून आता एका वर्षाने त्याच्या जवळचा मित्र छोटा शकीलचा मुलगा देखील आध्यात्माकडे वळला आहे. छोटा शकीलचा एकुलता एक मुलगा पाकिसातनच्या कराचीमध्ये आध्यात्मिक रस्त्यावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. छोटा शकील पाकिस्तानमध्ये राहतो. छोटा शकीलचा तिसरा मुलगा आणि सर्वात लहान मुलगा 18 वर्षाचा मुबश्शिर शेख 'हाफिज - ए - कुरान' बनला असून सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे. 

'हाफिज-ए-कुरान' त्याला म्हटलं जातं की, ज्याला पूर्ण कुरान तोंडपाठ आहे. कुरानमध्ये 6,236 आयते यांचा समावेश आहे. इस्लाममध्ये याला कोणत्या अनुयायीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट मानली जाते. युवा मुबश्शिरने आता कराचीमध्ये लोकांना कुराना शिकवण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुबश्शिर आपले वडिल अहमद शेख म्हणजे छोटा शकीलसोबत राहतो. 

दाऊद इब्राहिमचा मुलगा मोइन याने देखील धर्मगुरूचा मार्ग स्विकारला आहे. 'मौलाना मोइन'ने प्रेरित होऊन छोटा शकीलचा मुलगा मुबश्शिर आता टोपी घालून हातात तस्बीह (माळ) घेतली आहे. आणि लोकांना कुरानचं शिक्षण देऊन प्रचार करणार आहे. आपल्या वडिलांचे अपराधा माहित असूनही मुबश्शिर छोटा शकीलसोबतच राहत आहे.