नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra)तारीख जाहीर झाली आहे. यात्रा २३ जूनपासून सुरू होईल आणि ती तीन ऑगस्ट रोजी समाप्त होईल. ही यात्रा ४२ दिवस चालेल. मागीलवेळी यात्रा ४६ दिवस सुरु होती. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश बनल्यानंतर ही पहिली अमरनाथ यात्रा आहे. यात्रा सुरू करण्याचा निर्णय अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष उपराज्यपाल जी. सी. मुर्मू होते.
#BreakingNews । पवित्र अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra)तारीख जाहीर झाली आहे. यात्रा २३ जूनपासून सुरू होईल आणि ती तीन ऑगस्ट रोजी समाप्त होईल. ही यात्रा ४२ दिवस चालेल.https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/jrDq3ADjeW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 14, 2020
या अमरनाथ यात्रे ज्यांना नाव नोंदणी करायची आहे. त्यांना आपली नोंदणी १ एप्रिलपासून करता येणार आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या समस्या लक्षात घेता काही काळासाठी या यात्रेच्या प्रवासावर परिणाम झाला होता. पण आता हा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. जगन्नाथ यात्रा देखील २३ जूनपासून सुरू होईल. यात्रा तीन ऑगस्टला समाप्त होईल. बोर्डाने ऑनलाइन नोंदणीसाठी कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Amarnath Yatra to commence on 23rd June and conclude on 3rd August. Jammu and Kashmir Lt Governor & Chairman, Shri Amarnathji Shrine Board (SASB), Girish Chandra Murmu, presided over the 37th Board Meeting held in Jammu today. (file pic) pic.twitter.com/UTCBobPlVY
— ANI (@ANI) February 14, 2020
या पायलट प्रकल्पाला २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याचे यश पाहता बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. प्रवासी क्षेत्रातील अखंडित दूरसंचार कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रवाशांना सुरक्षा संबंधित मार्गदर्शक सूचना देण्यासाठी जागृती कार्यक्रमदेखील सुरू केला जाईल. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर ही पहिलीच अमरनात यात्रा आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. गतवर्षी ही यात्रा अर्धवट रोखण्यात आली होती.