Trending News - कोरोना महामारीनंतर आयुष्याच काही खरं नाही, असं काहीस सगळ्यांना वाटायला लागलं आहे. आपण सोशल मीडियावर पण अनेक अशा घटना पाहिल्या आहेत, जिथे क्षणात होत्याचं नव्हतं होतं. आयुष्याचा धावपळीत आपण आपल्याच लोकांना वेळ देत नाही. अगदी आपण स्व:तासुद्धा कामात इतके बिझी असतो की, जगण राहून जातं. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये जीवन जगण्याचा मूलमंत्र देण्यात आला आहे. कोणाची आहे ही पोस्ट आणि नेमकं काय म्हटलं आहे यात आपण जाणून घेऊयात.
उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांचा विनोदी आणि चर्चेत राहणाऱ्या ट्विटमुळे ते सोशल मीडियावर ओळखले जातात. आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्या फोटो त्यांनी जे कॅप्शन दिलं आहे ते जीवनाकडे बघिण्याचा आपल्या दृष्टिकोन बदलून टाकतो. ट्विटवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये काही बर्फाचे पुतळे एका सभागृहात ठेवले आहेत. या फोटोमध्ये लिहलं आहे की, ''एका इटालियन शिल्पाने प्रदर्शनात बर्फाचे पुतळे ठेवले आहेत. आयुष्य लहान आहे आणि ते वितळण्यापूर्वी त्याचा आनंद घ्या.''
हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा लिहतात की, ''पॉवरफूल फोटो. पृथ्वीवरील तुमचा जास्तीत जास्त वेळ चांगला आणि आनंदी राहावा...हा एक छोटा प्रवास आहे. त्याचं आयुष्याबद्दलचं हे ट्विट सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आनंद महिंद्रा यांनी सगळ्यांना हा खूप मोठा संदेश दिला आहे.''
सोशल मीडियावर याच्या या पोस्टची खूप चर्चा होत आहे. आनंद महिंद्रा यांनी हे ट्वीट रविवारी केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत या फोटोला 14 लाख लाइक मिळाले आहेत. तर 1488 यूजर्सने हे ट्विट रिव्टीट केलं आहे. त्याचा या पोस्टवर यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर म्हणतो, ''आपण खरंच यावर विचार करायला हवा.'' तर दुसरा यूजर म्हणतो की, ''हा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे.''
आयुष्यचा प्रवास हा खूप छोटा आहे, तो कधी कुठे थांबेल माहिती नाही. अशात आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा.
Powerful image. Perfect for Sunday reflection. Make the most of your time on the planet… it’s only a short trip.. pic.twitter.com/yE5UbbiFTC
— anand mahindra (@anandmahindra) July 31, 2022