गुवाहाटी : पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरूवातीला हाती आलेल्या कलांनुसार आसाम राज्यात भाजपला पुन्हा बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत भाजप 80 जागांवर आघाडीवर होती. तसेच कॉंग्रेसला देखील 35 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे.
आसाममध्ये एक्जिट पोलच्या मते भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करण्यात आला होता. आसाममध्ये 3 टप्प्यात मतदान पार पडले होते. राज्यात 126 विधानसभेच्या जागा आहेत. भाजपने सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपसमोर अनेक पक्षांचे आव्हान होते. त्यात कॉंग्रेसचाही सामावेश होतो.
2016 साली भाजपला 126 पैकी 86 जागांवर विजय मिळाला होता. आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. 2016 साली कॉंग्रेसच्या 26 जागा निवडुण आल्या होत्या. याशिवाय आसाम गण परिषदेला 14 जागांवर समाधान मानावे लागले होते.