एटीएममध्ये चोराची सुरक्षा रक्षकाला मारहाण

सुरक्षा रक्षक असतानाही एटीम मध्ये चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातही आला. पण दक्ष सुरक्षा रक्षकाच्या बहादुरीमुळे चोराचा हेतू सफल झाला नाही.

Updated: Oct 29, 2017, 03:49 PM IST
एटीएममध्ये चोराची सुरक्षा रक्षकाला मारहाण title=

पणजी : सुरक्षा रक्षक असतानाही एटीम मध्ये चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातही आला. पण दक्ष सुरक्षा रक्षकाच्या बहादुरीमुळे चोराचा हेतू सफल झाला नाही.

पणजीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास चोर एटीएम मध्ये शिरला होता. मात्र सुरक्षा रक्षकानं अटकाव केला असता चोरानं हातोड्यानं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. मात्र सुरक्षा रक्षकानेही चोराशी चांगलीच झुंज दिली.

सुरक्षा रक्षकाची हिंमत बघून चोर पळून गेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीये. या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद झाली आहे. पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडिओ