मुंबई : विकासाचा दावा करणाऱ्या यूपी आणि उत्तराखंड या दोन राज्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अॅम्बुलन्सची व्यवस्था न झाल्यामुळे नवऱ्याला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली होती.
पत्नीच्या निधनानंतर तिचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी अॅम्बुलन्सची मागणी करून देखील मिळाली नव्हती. अतिशय गरीब असलेल्या या व्यक्तीने अखेरीस आपल्या पत्नीचा मृतदेह आपल्या खांद्यावर टाकून टॅम्पो स्टँडपर्यंत घेऊन गेला. आणि तेथे लोकांकडून पैसे गोळा करून मृतदेह ऑटो रिक्षामध्ये घालून घरी घेऊन गेला.
पुढे आलेल्या माहितीनुसार त्या हॉस्पिटलकडे 2 शव वाहिन्या आहेत. गरजू लोकांना या शव वाहिन्या उपलब्ध केल्या जातात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याच देखील सांगण्यात आलं होतं. खांद्यावर पत्नीचे शव घेऊन जाणाऱ्या या गरीब आणि हतबल नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. ही असंवेदनशील घटना सोमवारी 7 मे रोजी दुपारी घडली आहे. आजारी असलेल्या पत्नीला घेऊन सादिक सकाळी जिल्हा रूग्णालयाच्या हॉस्पिटलमध्ये आला होता. दुपारी उपचारादरम्यान मुनीशाचा मृत्यू झाला.
पत्नीच्या आकस्मित मृत्यूनंतर कोलमडलेल्या नवऱ्याने रूग्णालयाकडे शव वाहनाची मागणी केली मात्र असंवेदनशील रूग्णालयातील लोकांनी याकडे दुर्लक्ष केला आणि खांद्यावर मृतदेह घरी घेऊन घरी जाण्याची वेळ नवऱ्यावर आली.