नवी दिल्ली : दोन मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँका HDFC बँक आणि ICICI बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवर (FD) व्याजदर वाढवले आहेत.
अशा परिस्थितीत आता एफडीच्या मॅच्युरिटीवर ग्राहकांना अधिक परतावा मिळू शकणार आहे. HDFC आणि ICICI बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक आहेत. आता त्यांची थेट स्पर्धा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेशी आहे. म्हणून या लेखात, आम्ही तिन्ही बँकांच्या वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवरील व्याजदरांबद्दल माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी एक चांगला पर्याय निवडू शकता.
व्याजदरातील नवीनतम बदलांनंतर, HDFC बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.50 टक्के ते 5.50 टक्के व्याज देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीमध्ये, HDFC बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3% ते 6.25 टक्के व्याज देत आहे. हे दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत.
त्याचप्रमाणे ICICI बँकेनेही आपल्या व्याजदरात बदल केला आहे. 7 दिवस ते 10 वर्षांसाठी, बँक 2.5 टक्के ते 5.5 टक्के व्याजदर देत आहे. तर 50 बेसिक पॉइंट्स (BPS) ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर देत आहे.
हेही वाचा - PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक
एचडीएफसी बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालील प्रकारे व्याज देते -
सामान्य लोकांसाठी 2.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.00% 7 ते 14 दिवसांसाठी.
हेदेखील वाचा - PM Awas Yojana | पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर रद्द होईल घर
SBI 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालील प्रकारे व्याज देते:
येथे लक्षात घेण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे FD वरील व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. मुदत ठेव (FD) ठराविक कालावधीत हमी परतावा देते.
त्यामुळे अनेक तज्ञ याला गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानतात. विशेषत: ज्यांना त्यांचे पैसे कोणत्याही धोक्याशिवाय वाढलेले पाहू इच्छितात त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे.
कोणत्याही बँकेत एफडी करताना, गुंतवणूकदाराने नेहमी योग्य कालावधी निवडावा. मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडल्यास तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. दंडाच्या बाबतीत, व्याजदर खूपच कमी होतो.
याआधी एफडीचे व्याजदर सातत्याने घसरत होते, त्यामुळे जोखीम न बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना आपले पैसे कुठे ठेवायचे असा पेच होता.
परंतु व्याजदरात झालेल्या ताज्या वाढीनंतर सुरक्षित गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.