पिस्ता हे मधुमेहावरील रामबाण उपाय; पण मग ते इतकं महाग का? कारण अतिशय महत्त्वाचं

Benefits of Pistachios: ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. यामध्ये पिस्ताचे नावही आवर्जुन घेतले जाते. पिस्ता डायबिटीसच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो. ते कसे जाणून घ्या.

Updated: Jan 13, 2025, 12:54 PM IST
पिस्ता हे मधुमेहावरील रामबाण उपाय; पण मग ते इतकं महाग का? कारण अतिशय महत्त्वाचं title=

Benefits of Pistachios for Diabetes: पिस्ता हे आरोग्यदायी गुणांनी भरपूर फळ मानले जाते. कित्येक लोकं पिस्ता भाजून खातात तर अनेक जण त्यापासून शिरा, आईसक्रीम, मिठाई असे पदार्थ बनवतात. पिस्ता मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ड्रायफ्रुट आहे. मुख्य कारण म्हणजे पिस्तामध्ये फायबर आणि अनसॅच्युरेटेड ऍसिड भरपूर प्रमाणात असते. हे भूक कमी करण्यात मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवून मधुमेहाचा धोका कमी करते. मद्रास डायबेटीस रिसर्च फाउंडेशनच्या एका संशोधनात असे आढळले आहे की जर सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी फक्त 30 ग्रॅम पिस्ता खाल्ला, तर प्री-डायबेटीसवर नियंत्रण मिळवता येते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर

भारतात सुमारे 15.3% लोकसंख्या म्हणजेच 13.6 कोटी लोक प्री-डायबेटीसच्या विळख्यात आहेत. चिंतेची बाब म्हणजे, यापैकी अनेकांना याबद्दल कल्पनाही नसते. डॉ. व्ही. मोहन यांच्या नेतृत्वाखाली 12 आठवड्यांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे आढळले की, जे प्री-डायबेटीक लोक रोज न्याहारी आणि जेवणापूर्वी पिस्ता खायचे, त्यांच्यातील शुगरचे प्रमाण कमी झाले. तसेच, जे लोक दररोज 60 ग्रॅम पिस्ता खात होते, त्यांचे वजनही स्थिर राहिले. वजन नियंत्रणात ठेवणे डायबेटीस टाळण्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

पिस्तामध्ये प्लांट-बेस्ड प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात, जे ओव्हरईटिंग रोखतात. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असल्याने हे LDL कोलेस्टेरॉल (घाणेरडं कोलेस्ट्रॉल) कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. पिस्ताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तो ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो. त्यामुळे डायबेटीस रुग्णांना पिस्ता नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. प्री-डायबेटीस असलेल्या लोकांसाठी पिस्ता हा वरदानासारखा मानला जातो.

पिस्ता सर्वात महाग ड्रायफ्रुट का?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडांपासून दरवर्षी पिस्ता मिळत नाही. पिस्ताची लागवड केल्यावर 15 ते 20 वर्षे वाट पाहावी लागते. 15 ते 20 वर्षे झाल्यानंतर पिस्त्याच्या झाडाला फळे यायला सुरुवात होते. एवढ्या वर्षांपर्यंत त्या झाडांची योग्यरीत्या काळजी घ्यावी लागते. यासाठी येणारा खर्च सुद्धा अधिक प्रमाणात असतो.

या झाडाला खूप जास्त जागा द्यावी लागते त्याशिवाय जास्त प्रमाणात पाणीसुद्धा लागते. पिस्तांचे पिक घेण्यासाठी बरेच कामगार लागतात. त्यामुळे पिस्त्याची किंमत इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा खूप जास्त असते. 15 वर्षानंतर एका झाडापासून साधारणत: 22 किलो पिस्ता मिळतो. ब्राझिल देश याला अपवाद आहे. या देशात दरवर्षी 90 किलो इतक्या पिस्ताचे उत्पादन घेतले जाते.

पिस्ता हा केवळ चविष्ट नसून, आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सजग असणाऱ्या प्रत्येकाने आहारामध्ये पिस्ताचा समावेश करायला हवा.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)