5 Days Week in Banks : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे महत्त्वाचा निर्णय!

Five Day Working in Banks: तुमचे जर बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण बॅंक ग्राहकांना आता शनिवार बँकेची पायरी चढण्याची गरज नाही. जाणून घ्या बँक संदर्भात महत्त्वाचा  निर्णय कोणता आहे?  

Updated: Mar 2, 2023, 01:16 PM IST
5 Days Week in Banks : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे महत्त्वाचा निर्णय! title=
Five Day Working in Banks

Five Day Working in Banks: बँकेची (Bank News) कामे करण्यासाठी तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असेल. कारण बँक ग्राहकांना आता शनिवारी बँकेची पायरी चढता येणार नाही. इतरवेळी ऑफीस कामामुळे आपल्याला बँकेची कामे करण्यास वेळ मिळत नाही. म्हणून तिसरा किंवा चौथ्या शनिवारची आपण वाट पाहतं असतो. मात्र आता बँकेच्या एका निर्णयामुळे आता हे पण शक्य होणार नाही असे वाटतयं.. जरी बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी ग्राहकांना मात्र सोमवार ते शुक्रवारमध्येच बँकेची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत... 

बँक कर्मचारी आणि त्यांच्या संघटना अनेक दिवसांपासून पाच दिवसांच्या आठवड्यांची मागणी करत होते. त्यानूसार लवकरच बँकेत पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. कारण  इंडियन बँक्स असोसिएशन (IBA ) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज यांच्यात चर्चा सुरू झाली असून लवकरच बँक कर्मचार्‍यांची पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची मागणी प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकते. 

वाचा: कसबा-चिंचवड पोटनिवडणूक निकाल 

दररोज किती करावं लागणार जास्त काम...

नव्या करारानुसार बँक कर्मचाऱ्यांना दररोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागणार आहे. रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. मात्र येत्या काळात प्रत्येकी शनिवार आणि रविवारी बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.  याबाबत लवकरच नवीन व्यवस्था सुरू होऊ शकते. याबाबत संघटनेने संमती दिली आहे. बँक युनियन अनेक दिवसांपासून पाच दिवस काम करण्याची मागणी करत आहेत.

गेल्या वर्षी LIC मध्ये पाच दिवसांचा आठवडा

2022 साली LIC मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्याच्या पाच दिवस आधी केले गेले होते. यानंतर बँक संघटनांकडून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जोर धरू लागली. ऑल इंडिया बँक ऑफिसर्सचे सरचिटणीस एस नागराजन यांनी सांगितले की, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम 25 अंतर्गत सरकारला सर्व शनिवार सुट्टी म्हणून घोषित करावे लागतील.

अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 40 मिनिटे अधिक काम करावे लागेल. हा प्रस्ताव आयबीएने मान्य केल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बहुतांश ग्राहक मोबाईल बँकिंग, एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधा वापरत असल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु तरीही काही ग्राहकांनी शाखेला भेट देणे पसंत केले आहे.