Former PM Manmohan Singh's Speech in Urdu : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सगळीकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे सल्लागार संजय बारू यांनी त्यांची आठवण सगळ्यांसोबत शेअर केली आहे. त्याविषयी सांगितलं की मनमोहन सिंग यांना हिंदी वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांची भाषण ही गुरुमुखीमध्ये किंवा मग उर्दूमध्ये लिहिण्यात येत होती.
संजय बारू यांनी त्यांच्या 2014 मध्ये ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या प्रकाशित केलं होतं. त्या पुस्तकात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते म्हणाले होचे की भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हिंदी वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांची सगळी भाषणं ही उर्दूमध्ये लिहिण्यात यायची. त्याविषयी सांगत त्यांनी पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करत लिहिलं की ते हिंदीमध्ये बोलू शकत होते, पण कधी देवनागरी लिपी किंवा हिंदी भाषेत बोलायला शिकले नाही. तर दुसरीकडे ते स्पष्टपणे उर्दू वाचू शकत होते. हेच एकमेव कारण आहे की मनमोहन सिंग हे इंग्रजीमध्ये भाषण द्यायचे. त्यांना त्यांचं पहिलं भाषण देण्यासाठई तीन दिवस प्रॅक्टिस करावी लागली.
खरंतर मनमोहन सिंग यांचा जन्म हा आता पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबच्या गाह गावात 26 सप्टेंबर 1932 मध्ये गुरमुख सिंह आणि अमृत कौर यांच्या घरी झाला होता. त्यांनी 1948 मध्ये पंजाब यूनिव्हर्सिटीमधून मॅट्रिकचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते ब्रिटिनच्या कॅम्ब्रिज यूनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र शिकण्यासाठी गेले. त्यांनी 1957 मध्ये प्रथम श्रेणीत डिग्री मिळवली होती. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी 1962 मध्ये ऑस्कफोर्ड युनिव्हर्सिटीच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिलचं शिक्षण पूर्ण केलं.
हेही वाचा : मनमोहन सिंग यांच्या 'या' 10 निर्णयांनी बदलला होता भारताचा चेहरामोहरा; वाचा विदर्भ कनेक्शन
त्यावेळी ते पुस्तक प्रकाशित करण्याची वेळ आणि त्यासोबत त्यात असलेल्या अनेक गोष्टींविषयी वाद निर्माण झाले होते. त्यांनी हे पुस्तक लिहिण्या मागचं कारण काय असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यांच्या पुस्तकावरून त्यानंतर 2019 मध्ये एक चित्रपट देखील बनवण्यात आला होता. त्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टींवरून देखील वाद निर्माण झाला होता.