Everything is fair in love and war म्हणजेच प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असं म्हणतात. ही बातमी आहे अशाच एका प्रेमकहाणीची. प्रेमात सर्व माफ असतं असं म्हंटलं तरी या बातमीत त्या कुटुंबाने त्या प्रेम करणाऱ्या दोघांना माफ केलेलं नसेल. बातमी आहे नात्याला काळिमा फासणारी. या बातमीमधील तो मामाच्या घरी राहायला गेला. मामालाही भाचा घरी आल्याने आनंद झाला. मामाचं नवीनच लग्न झालेलं. मामीलाही तो घरी आल्याचा आनंद झाला होता. मामा आणि मामीचं नुकतंच लग्न झालेलं. मामीही तरुणच होती.
भाचा आणि मामी यांची चांगली गट्टी जमली. आता भाचाच आहे म्हंटल्यावर कुणालाही काही संशय येण्याचा प्रश्नच नव्हता. भाचा आणि मामी एकमेकांना भेटायचे, एकमेकांसोबत वेळ घालवायचे. घरच्यांना त्यांच्यात काय खिचडी शिजत होती, हे समजलंच नाही. भाचा आणि मामी भेटतात, एकमेकांसोबत बोलतात, हे केवळ एका मातृत्वाच्या भावनेने किंवा सामाजिक चौकट ठेवून असेल, असं सर्वांच्या डोक्यात. मात्र, मामी आणि भाच्यात सुरु होतं वेगळंच काही. कारण, त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलेलं. मामीला भाचा आणि भाच्याला मामी आवडायलाल लागलेली. त्यांचं नातं हे केवळ एक भाचा आणि एका मामीचं राहिलेलं नव्हतं.
एक दिवस असा जेंव्हा हा भाचा आणि मामी पळून गेल्याचं कुटुंबियांना समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबीयांनी ज्याचा स्वप्नातही विचार केला नसेल असंच काहीसं प्रत्यक्षात घडलं होतं. मामाचं तर डोकं बधिर झालेलं. आपलाच भाचा आणि आपलीच बायको यांमध्ये असं कसं होऊ शकतं या विचारांनी त्याचं डोकं भणभणून गेलेलं. मामाला आणि त्याच्या कुटुंबियांच्या तोंडावर काळं फासत भाचा आणि मामी रफूचक्कर झालेले.
भाचा आणि मामीने एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ही बातमी आहे मननपूर गावातील. याच मननपूर गावातील एका तरुणाचं डुमरो गावातील एका मुलीशी लग्न झालं होतं. याच मामाच्या घरी चंदन नावाचा भाचा राहायला आला होता. यदरम्यान चंदन आणि मामीची जवळीक वाढली आणि शेवटी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
bhanja and mami love story chandan ran with mami big shok to mama