Chandigarh University MMS : चंदीगढ युनिवर्सिटी एमएमएस लीक (Chandigarh University Mms Scandal) प्रकरणातील आणखी एक धक्कायक माहिती नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणामध्ये आता आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अद्यापही या व्यक्तीवर कोणतीही अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या व्यक्तीकडून तरुणीला धमकावलं जात होतं. आता हा धमकावणारा व्यक्ती कोण ही माहिती मात्र अद्यापही समोर येऊ शकली नाही. (Big news Chandigarh University MMS Shocking revelations )
सदर प्रकरणात एका मुलीने 60 मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून लीक केल्याची घटना समोर आली होती. ही मुलगी तिच्या सनी नावाच्या प्रियकराला (Boyfriend) व्हिडीओ पाठवत होती, तो या व्हिडीओ एका डिवाईसमध्ये स्टोअर करत होता. पोलिसांनी सध्या सनीकडून व्हिडीओ स्टोअर करण्यात आलेलं डिवाईस ताब्यात घेतलं आहे.
हे प्रकरण आता इतक्या गंभीर वळणावर आलं आहे, की त्यामध्ये मुंबई आणि गुजरातशी (Mumbai Gujrat) धागेदोरे जोडण्यात येत आहेत. सदर प्ररकरणाच्या चौकशी आणि तपासासाठी सोमवारी तीन सदस्यीय पथक तयार (SIT) करण्यात आलं. ज्यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
चंदीगढ युनिवर्सिटी काय म्हणाली?
या संपूर्ण प्रकरणावर चंदीगढ युनिवर्सिटी (Chandigarh University) प्रशासनाने अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवण्यात आल्याचं नाकारलं. किंबहुना विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चाही विद्यापीठाकडून धुडकावून लावण्यात आल्या. आत्महत्या केल्याची चर्चा पूर्णपणे अफवा असल्याचेही स्पष्टीकरण यावर दिले.
दरम्यान, या प्रकरणी आरोपी तरूणीच्या प्रियकराला शिमला येथून अटक करण्यात आली आहे. हा तोच तरुण, ज्याला आरोपी तरुणी व्हिडिओ पाठवायची आणि तो सोशल मीडियावर अपलोड करायचा.