.....असं आहे ११ हजार फुटांवर स्थिरावलेलं भाजप कार्यालय

पाहा नेमकं हे कार्यालय आहे तरी कुठे

Updated: Nov 8, 2019, 01:39 PM IST
.....असं आहे ११ हजार फुटांवर स्थिरावलेलं भाजप कार्यालय title=
.....असं आहे ११ हजार फुटांवर स्थिरावलेलं भाजप कार्यालय

मुंबई : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर भाजप सरकारकडून लडाख हा केंद्रशासित प्रदेश  असल्याचं जाहिर करण्यात आलं. ज्यानंतर काही दिवसापूर्वीच या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना अधिकृत दर्जाही बहाल करण्यात आला. यातच पुढचं पाऊल टाकत आता भाजपकडून लडाख या नव्याने समोर आलेल्या केंद्रशासित प्रदेशातील लेह येथे भाजपचं पक्ष कार्यालय सुरु करण्यात आलं आहे. 

अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं हे मुख्यालय समुद्रसपाटीपासून ११ हजार ५०० फूटांवर स्थिरावलं आहे. गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या कार्यालयाचं उदघाटन केलं. सर्वसामान्यही या कार्यालयाशी सहजपणे जोडले जाणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधाही या कार्यालयात पुरवण्यात आली आहे. ज्या माध्यमातून दिल्ली मुख्यालयाशी थेट संपर्कही साधता येणार आहे. 

BJP LEH

बऱ्याच अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा या कार्यालयाचं संपूर्ण विधी आणि पूजाअर्चेनंतर उदघाटन करण्यात आलं. यावेळी लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल आणि इतरही नेतेमंडळी उपस्थित होते. आता या कार्यालयातून स्थानिकांच्या समस्यांपासून भाजप कार्यकत्यांच्या कामगिरीवरच अनेकांचं लक्ष असेल. या प्रदेशात लेह आणि कारगिल असे दोनच जिल्हे आहेत. 

BJP LEH 1

सध्याच्या घडीला येथील लोकसंख्या २,७४,२८९ इतकी आहे. ज्यामध्ये लेहमध्ये १,३३,४८७ इतकी लोकसंख्या आहे. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक जनता बौद्धधर्मीय आहे. मुख्य म्हणजे लडाखमदील लोकसभेची जागासुद्धा भाजपकडे आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून भारत- चीन सीमा प्रश्नांवर सत्ताधारी भाजपची एकंदर भूमिका पाहता काही आव्हानं पाहता या ठिकाणी भाजप कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.