नवी दिल्ली : बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाल आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा झाली. भाजपला बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका नकोत, असं वक्तव्य भाजप नेते जे.पी.नड्डा यांनी संसदीय दलाच्या बैठकीनंतर दिलं आहे.
दुसरीकडे पाटण्यातही भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. सुशील मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक संपन्न झाली. भाजपला मध्यावधी निवडणुका नकोत असं विधान बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केलंय.
नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईला साथ दिल्याबद्दल मोदींनी नितीश यांचे ट्विटरवरुन आभार मानलेत. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्यात.