Fight At BJP MP Event Over Mutton Watch Video: निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना प्रचाराला बोलवायचं म्हणजे त्यांच्या येण्या-जाण्याच्या व्यवस्थेपासून ते अगदी खाण्यापिण्याची सोयही उमेदवारांना करावी लागते. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्याप्रमाणात निवडणुकीच्या माध्यमातून हा तत्पुरता रोजगार हातशी लागलेले हजारो कार्यकर्ते आहेत. मात्र दरवेळेस या कार्यकर्त्यांच्या मागण्या नेत्यांना पूर्ण करता येतातच असं नाही. बरं यासाठी केवळ निवडणुकीच्या प्रचारात नाराजी असते असंही नाही. कार्यकर्त्यांच्या नाराजीचं आणि त्यांनी वाद घालण्याचं कारण काहीही असू शकतं. असाच प्रकार एका भाजपा खासदाराने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये घडला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये झालेला राड्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपाचे उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरचे खासदार विनोद बिंद यांनी मेजवानची आयोजन केलं होतं. यासाठी जेवायला आलेल्या पाहुण्यांना आणि कार्यकर्त्यांना जेवण वाढताना मटणाचे खडे काही मिळाले नाहीत. 14 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेजवानीमध्ये हजारो लोकांना आमंत्रण होतं. खासदाराकडून मेजवाणीचं आमंत्रण आल्याने पंचक्रोषीतून या ठिकाणी लोकांनी गर्दी केली. मात्र मटण वाढताना अनेकांना केवळ रस्साच वाढण्यात आला. आता मटणाचा तुकडा न मिळाल्याने अनेकांनी जाब विचारला. मात्र त्यावर उलट उत्तर मिळाल्याने आधी शाब्दिक वाद सुरु झाला आणि त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. खासदाराच्या भावाने मटणाचे तुकडे कुठे आहेत? या प्रश्नाकडे दूर्लक्ष करत रस्सा वाढणं सुरु ठेवल्याने पाहुणे अधिक संतापले.
यानंतर आयोजक खासदाराचे समर्थक आणि पाहुणे यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. मटणाचे तुकडे का वाढले नाही यावरुन अनेकजण एकमेकांवर धावून गेले. एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतरचे कार्यक्रम स्थळावरील व्हिडीओ आता समोर आले आहेत. कछवा पोलीस स्थानकाअंर्गत येणाऱ्या करसडा येथे विनोद बिंद यांचं कार्यालय आहे. या पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिर्जापुर-
बीजेपी सांसद विनोद बिंद के कार्यालय में एक दावत के दौरान बकरे की बोटी के बजाय रसा परोसे जाने पर हंगामा खड़ा हो गया।
लोगों के बीच जमकर लात-घूसे चले। कई लोगों में मारपीट भी हुई।
पुलिस कह ही है - मामले की जांच कर रहे हैं। #mirzapur pic.twitter.com/DYN1Kfts63
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) November 15, 2024
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.