मतदाराने आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार

अन् आमदार साहेब भडकले

Updated: Nov 20, 2018, 08:07 PM IST
मतदाराने आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार title=

भोपाळ : मध्यप्रदेशात सध्या उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारसंघातील मतदारांच्या भेटी घेत आहेत. नागदा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार दिलीप शेखावत यांच्याबाबत एक धक्कादायक घटना घडली.. मतदारांच्या भेटी घेत असताना एका व्यक्तीने शेखावत यांना चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. शेखावतांच्या हे लक्षात येताचं क्षणाचाही विलंब न करता हा हार काढून फेकून दिला.

दरम्यान, इंदूरच्या रऊ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान काँग्रेस आमदार आणि उमेदवार जितू पटवारी यांचा समाजमाध्यमांवर वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये महिला मतदार पैसे घेऊन मतदान करतात असा आरोप केला. त्यावर उपस्थित महिलांचा संताप झाला. जितू पटवरींनीही आक्रमकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याचा होताना दिसत नाही. महिलांच्या आक्रमक पवित्रा बघून आता जितू पटवारीही सामोपचारानं घेण्याचा करतात खरे. पण महिलांचा रोषाला सामोरं जावं लागले.