लेखिका आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना आपल्या अभिनय आणि लिखाणासोबतच स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ट्विंकल खन्नाने सैफ अली खान हल्ला प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना पार्टीकरत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. नवऱ्यावर हल्ला झाला तेव्हा करीना कुठे होती? सैफला हॉस्पिटलमध्ये नेताना करीना तेथे का नव्हती? या ना अशा अनेक प्रश्नांनी करीना कपूरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. या प्रकरणावर पोस्ट करत ट्विंकल खन्नाने सगळ्यांना चांगलीच शाब्दिक चपराक लगावली आहे.
रविवारी इंस्टाग्रामवर ट्विंकल खन्नाने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने म्हटलंय की, समाज पत्नीला कधीच महत्त्वाचा किंवा पहिल्या क्रमांकाचा दर्जा देत नाही. पण जेव्हा आरोप-प्रत्यारोप किंवा एखाद्या गोष्टीला जबाबदार धरायचं असेल तर त्यासाठी पत्नी अव्वल क्रमांकावर असते.
‘एका अभिनेत्यावर चाकूने हल्ला केल्यानंतर त्याची पत्नी घरी नव्हती किंवा हल्ल्यादरम्यान त्याला मदत करण्यासाठी खूप मद्यधुंद होती अशा हास्यास्पद अफवा पसरल्या आहेत. लोकांना फक्त पत्नीला दोष देण्यात मज्जा येते. ही एक अतिशय परिचित पद्धत होती.
जेव्हा बीटल्स वेगळे झाले, तेव्हा लोकांनी योको ओनोला दोष दिला. मेलानियावर अनेकदा गप्प राहिल्याबद्दल किंवा तिच्या पतीच्या धोरणांना मर्यादित सार्वजनिक विरोध केल्याबद्दल टीका केली जाते. जिल बायडेनला जो यांना त्यांचा प्रचार सुरू ठेवण्यासाठी भाग पाडल्याबद्दल जबाबदार धरले जाते. जेव्हा विराट कोहली आऊट होतो तेव्हा अनुष्काला जबाबदार धरले जाते.
हा एक व्यापक मुद्दा आहे, जो केवळ लोकांच्या नजरेत जोडप्यांपर्यंत मर्यादित नाही. जर तुमच्या पतीचे वजन खूप वाढले तर तुम्ही त्याच्या आरोग्याची काळजी घेत नाही; जर त्याने खूप किलो वजन कमी केले तर तुम्ही त्याला चांगले खायला देत नाही. जर तो काळजी घेत असेल तर ते दावा करतील की तुम्ही त्याला हाताळले आहे; जर तो उदासीन असेल तर ते तुम्हाला त्याला योग्यरित्या समजून घेत नाही असा दोष फक्त पत्नीलाच दिला जातो.
गेल्या आठवड्यात मी एका छोट्याशा कौटुंबिक कार्यक्रमाला गेले होतो जिथे एका नातेवाईकाने म्हटले होते, ‘पाहा, माझे पाच काका टक्कल पडले आहेत. फक्त माझेच केस गेलेले नाही कारण माझं लग्न झालेलं नाही. टक्कल पडण्यासाठीही आता बायकांनाच दोषी ठरवता येते.
या संदर्भात, मला असे म्हणणे योग्य वाटते की प्रत्येक पुरूषाच्या मागे, तो पराभूत असो वा नसो, एक अशी स्त्री असते. जिची बदनामी होणार आहे. सगळ्याला तिलाच जबाबदार धरले जाणार आहे. ’
सहमत आहात? की नाही?
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. सैफ अली खानच्या सुरक्षेपासून करीना तेव्हा नेमकी कुठे होती? इथपर्यंत अनेक प्रश्नांवरुन त्यांना ट्रोल केलं जात आहे.