नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अयोध्येत राम मंदिर उभारलं जाण्याविषयी भाष्य केलंय. आम्हाला राम मंदिरासाठी केवळ एक वीट ठेवायची नाही तर संपूर्ण मंदिर उभारायचंय, असं अमित शाह यांनी म्हटलंय. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांच्याशी एक्सक्लुझिव चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. मंदिर निर्माणासाठी अध्यादेश आणणं तसंच या संदर्भाशी निगडीत अनेक प्रश्नांवर उत्तरं देताना भाजपाध्यक्षांनी हे वक्तव्य केलंय.
राम मंदिरासाटी केवळ एक वीट ठेवायची नाही तर संपूर्ण मंदिर उभारायचंय. न्यायालय या मुद्यावर विचार करत आहे त्यामुळे या प्रश्नावर घाई करणं योग्य ठरणार नाही. आम्ही जनतेच्या संवेदना समजतो आणि त्यांना उत्तरही देण्याचा प्रयत्न करतो, असं अमित शाह यांनी म्हटलंय.
कोर्टात या प्रश्नावर लवकरच सुनावणी होणार आहे. जानेवारी महिन्यात ही सुनावणी होईल, त्यामुळे अजून आम्हाला अध्यादेश आणण्याची गरज वाटत नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.