बरेली : आजकाल सेक्स करण्यासाठी तरूण जोडपी हॉटेलचा वापर करतात. अशाप्रकराचं सेक्स करण त्यांच्या अंगलट आल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. मात्र या घटनेत काही विपरीतचं घडलं आहे. ओरल सेक्स करता करता पार्टनर इतका उत्तेजित होतो की, नंतर जे तो करतो, त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.
या घटनेत दोघा मित्रांची घट्ट मैत्री आहे. या मैत्रींचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. दोघेही मित्र नेहमी सेक्स करण्यासाठी हॉटेलमध्ये जायचे. असेच त्या दिवशी ते सेक्स करण्यासाठी ह़ॉटेलमध्ये आले होते. दोघांनी सेक्स करण्यास सुरुवात केली. यावेळी ओरल सेक्स दरम्यान त्याचा पार्टनर त्याला व्हिडिओ काढत होता. हे त्याच्या दुसऱ्या पार्टनरला आवडले नाही. त्यामुळे या प्रकाराला त्याचा मित्र विरोध करत होता.
या व्हिडिओ काढण्यावरून दोघांमध्ये वादही झाला. पहिल्या पार्टरने त्याचा ओरल सेक्स दरम्यानचा अश्लील व्हिडिओ काढून त्याला ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली होती. या धमकीवरून पहिल्या पार्टनरने दुसऱ्या पार्टनरचा चाकूने प्रायव्हेट पार्टच कापला. ही घटना हॉटेलमध्ये चव्हाट्यावर येताच मोठी खळबळ माजली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. या घटनेनंतर तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पोलीस आणि हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांची एकमेकांशी घट्ट मैत्री होती, दोघांचे एकमेकांशी शारीरिक संबंध होते. या कारणावरून दोन्ही मुलांनी बरेलीतील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. मात्र खोलीतून शिवीगाळ आणि मारहाणीचे आवाज येऊ लागल्याने हॉटेलवाल्यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा त्यांना कळाले की तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला आहे.
दरम्यान प्रायव्हेट पार्ट कापणाऱ्या तरुणाचा आरोप आहे की, दुसरा तरुण हा त्याचा मित्र असून त्याच्यासोबत चुकीचे कृत्यही करत असे. अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यामुळे व्यथित होऊन त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे त्याने सांगितले.
यूपीच्या बरेलीमधल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडलीय. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.