प्रेयसीच्या घरी नवरीसारखी साडी नेसून गेला प्रियकर, त्यानंतर जे झाले...... पाहा व्हीडिओ

युपीच्या बदोही जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे एक प्रियकर आपल्या प्रेयसीपासून विरह सहन न करु शकल्याने तिच्या घरी  नवरीच्या वेशात लाल रंगाच्या साडीत आला. 

Updated: Jun 7, 2021, 04:47 PM IST
प्रेयसीच्या घरी नवरीसारखी साडी नेसून गेला प्रियकर, त्यानंतर जे झाले...... पाहा व्हीडिओ title=

बदोही : लॉकडाऊनमुळे सगळ्यांचे खुप हाल झाले आहेत. खाण्या-पिण्याच्या गोष्टीपासून ते अगदी लोकांच्या बाहेर फिरण्यावरही बंदी लावली गेली. परंतु या सगळ्यात हाल झाले ते प्रेमी जोडप्यांचे. देशात संचार बंदी असताना लोकांना कामा शिवाय बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे प्रेमी जोडे तरी कसे बाहेर फिरणार? त्यामुळे प्रेयसीपासून विरह असहाय्या झाल्याने एका प्रियकराने जे काही केलं ते सगळ्यांनाच आश्चर्य करणारे आहे. याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे.

युपीच्या बदोही जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे एक प्रियकर आपल्या प्रेयसीपासून विरह सहन न करु शकल्याने तिच्या घरी  नवरीच्या वेशात लाल रंगाच्या साडीत आला. त्याच्या प्रेयसीच्या घरच्यांना वाटले की, त्यांच्या मुलीची मैत्रीण असावी, जी तिला भेटायला आली. त्यामुऴे त्यांनी देखील त्याला थांबवले नाही.

थोड्य़ा वेळाने त्याच्या वागण्यावर संशय आल्याने घरच्यांनी त्याला डोक्यावरील पदर काढायला सांगितले. परंतु तो पदर काढायला तयार नव्हता. तेव्हा घरच्यांना आणखी जास्त संशय आला. त्यानंतर घरच्यांनी बळजबरीने त्याला पदर काढला, त्यानंतर सगळ्याच कुटूंबीयांना धक्का बसला. कारण त्या नवरीच्या वेशात एक मुलगा होता.

त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याला चार थोबाडीत बजावल्या आणि मारत मारत घराबाहेर आणले. घराबाहेर आल्यनंतर लोकांनी काय झाले हे पाहायला गर्दी केली. या गर्दीचा फायदा घेऊन तो प्रियकर आपल्या मित्राच्या गाडीवरुन पळून गेला.

तो तेथून निसटला खरा परंतु गर्दीतल्या कोणत्यातरी व्यक्तीने हे संपूर्ण प्रकरण मोबाईलमध्ये शूट केले. ज्यामुळे हा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.