नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढे 'श्री' न लावणे बीएसएफ जवानाला महागात पडले. पंतप्रधानांच्या नावाआधी 'श्री'चा उल्लेख न केल्याने त्याचा पगार कापण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन सारवासारव करण्यात आली. लल्लन टॉप वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
एखाद्याच्या नावापुढे आदराने श्री लावणं इतपत सर्व ठिक आहे. पण 'श्री' चा उल्लेख न केल्याने एका आठवड्याचा पगार कापण हे विचित्र होतं.
त्यातही एखाद्या बीएफएफ जवानासोबत हे होत असेल तर काय म्हणणार ? हे प्रकरण माध्यमांधून बाहेर आल्यानंतर यावर सारवासारव करण्यात आली.
This order has been rescinded. Concerned commandant has been cautioned for not dealing with the matter judiciously@PMOIndia @HMOIndia https://t.co/NYETTF8Wd8
— BSF (@BSF_India) March 7, 2018
पंतप्रधानांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यानंतर जवानाला त्याचा कापलेला पगार देण्यात आला. या कार्यवाही संदर्भात ट्वीटही करण्यात आलयं.