Budget 2024 Announment in Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी तरुणांसाठी रोजगारासंदर्भात 3 योजना जाहीर केल्या. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, एक कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. 10 हजार जैविक केंद्र उभारले जाणार आहेत. निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
विकसित भारताला प्रथम प्राधान्य देणार तसेच तेल उत्पादक बियाणे आणि भाजीपाला उत्पादन वाढीसाठी मदत केली जाणार आहे. राज्य सरकारसोबत समन्वय साधणार आणि६ कोटी शेतकऱ्यांचा डिजिटल सर्व्हे केला जाणार आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. रोजगार आणि स्किल डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत.
पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार आहे. ही योजना सर्व क्षेत्रांना लागू असेल.नवीन नोकरी करणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांना लाभ मिळणार आहे.
ईपीएफओ रजिस्टर झाल्यानंतर 50 हजार रुपयांचा इंसेन्टिव्ह मिळणार आहे.
उत्पादन वाढीसाठी शेतीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सरकार आणि खासगी संस्थांकडून नवीन रिसर्च केला जाणार आहे. ईपीएफओसह फर्स्ट टाईम नोकरी करणाऱ्यांचाही डेटा गोळा केला जाणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची व्यवस्था करण्यात येईल. त्या कर्जावर 3 टक्के सवलत देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांना ई व्हाउचर्स दिले जाणार आहेत.
नव्या रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद केली जाणार आहे.
1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यात येणार आहे.