Nirmala Sitharaman Networth: सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण सादर करत आहेत. त्या सलग सातव्यांदा अर्थसंकल्पाचे भाषण करुन एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करतील. यावेळचा बजेट खूपच मजबूत असेल असे संकेत पंतप्रधान मोदींनी आधीच दिले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे लागून राहिल्या आहेत. प्रसिद्ध पत्रिका फोर्ब्सने जगातील सशक्त महिलांच्या जाहीर केलेल्या यादीत निर्मला सितारमण यांना स्थान दिले होते.निर्मला सितारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराईतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे तर आई हाऊसवाईफ होती.देशाचे बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
निर्मला सितारमण आणि परकाला प्रभाकर यांची पहिली मुलाखत जेएनयूमध्ये झाली होती. यानंतर 1986 मध्ये दोघांनी लग्न केले. निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी आंध्रप्रदेश सरकारसोबत काम केले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर त्यांनी सडकून टीका केली होती. यानंतर अर्थमंत्र्यांचे पतीच टीका करत असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.
निर्मला सितारमण यांची मुलगी परकला वांगमयीने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीत मास्टर्स, त्यानंतर बोस्टनच्या नॉर्थवेस्टन विद्यापीठात जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली.
निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील.
निर्मला सितारमण यांनी तिरुचिरापल्लीच्या सितालक्ष्मी कॉलेजमधून बीए केले आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून अर्थशास्त्रात पीजी केले आहे.सोबतच त्यांनी एमफील देखील केले आहे. 2006 मध्ये त्या भाजपमध्ये आल्या. त्या भाजपच्या प्रवक्त्यादेखील राहिल्या आहेत.
'मायनेता'वरील माहितीनुसार त्यांच्याकडे 2 कोटी 50 लाख 99 हजार 396 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 315 ग्राम सोने आणि 2 किलो चांदी आहे. त्यांच्याकडे कोणतीच कार नाही. हैदराबादमध्ये त्यांच्याकडे 16 लाख किंमतीची जमिन आहे. त्यांच्याकडे 17 हजार 200 रुपयांची कॅश आणि 45 लाख 4 हजार 479 रुपयांचा बॅंक बॅलेंस आहे.
निर्मला सितारमण यांची शेअर्स आणि इतर ठिकाणी गुंतवणूक आहे. त्यांनी विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. तर काही खासगी कारणांमुळे त्यांनी काही लोकांकडून कर्जदेखील घेतले आहे. त्यांच्या डोक्यावर 33 दशलक्ष 94 हजार 838 रुपयांचे कर्ज आहे.