Budget 2024 : देशाचा बहुप्रतिक्षित असा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून, जिथं यंदाच्या अर्थसंकल्पानंतर नेमकं काय स्वस्त आणि काय महाग होणार? याच प्रश्नाच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तिथंच अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. किंबहुना तशी सुरुवात झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कारण, गॅस दर पुन्हा वाढले आहेत. अर्थात हे घरगुती वापरातील गॅस सिलेंडर नसून, व्यावसायिक गॅसच्या दरात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस 14 रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. परिणामी आता हॉटेलमधील खाणं महागण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
मागच्याच महिन्यामध्ये व्यावसायिक गॅसचे दर 1.50 रुपयांनी वाठढले होते. ज्यानंतर आता ही नवी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु असल्यामुळं गॅस सिलेंडरच्या मागणीमघ्ये वाढ असून, त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील एकंदर दरांवर झाले आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नेमकी कोणत्या फरकानं व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तरही पाहून घ्या.