आरोग्य विम्यामध्ये मोठे बदल; न जन्मलेल्या बाळालाही मिळणार विम्याचा फायदा

 लवकरच जन्म न झालेल्या बाळासाठीही आरोग्य विमा उपलब्ध होणार आहे.

Updated: Oct 27, 2021, 03:18 PM IST
आरोग्य विम्यामध्ये मोठे बदल; न जन्मलेल्या बाळालाही मिळणार विम्याचा फायदा

नवी दिल्ली : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आरोग्य विमा फायद्याचा ठरतो. आज विमा कंपन्या वेगवेगळ्या आजारांसाठी आरोग्य विमा उपलब्ध करून देत आहेत. परंतू जन्म न झालेल्या बाळाच्या आणि त्याच्या संबधित आजारांसाठी आतापर्यंत कोणताही आरोग्य विमा उपलब्ध नव्हता. परंतु लवकरच जन्म न झालेल्या बाळासाठीही आरोग्य विमा उपलब्ध होणार आहे.

या कंपन्यांनी दिली संमती
इंडियन असोशिएशन ऑफ पीडियाट्रिक सर्जन (IAPS)अनेक दिवसांपासून न जन्मलेल्या बाळांना आरोग्य विम्याबाबत विचार करीत आहे.

आयएपीएसचे अध्यक्ष रविंद्र रामद्वारचे म्हणणे आहे की, 2 खासगी कंपन्यांनी न जन्मलेल्या मुलांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. देशात दरवर्षी लाखो कुटूंबांमध्ये न जन्मलेल्या मुलांच्या आजारांबाबत अडचणी निर्माण होतात. या निर्णय़ामुळे या आजारांच्या उपचारासाठी मदत होणार आहे.

देशात दर वर्षी 17 लाखाहून जास्त मुलांना जन्माच्या वेळी आजारांच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या एका रिपोर्टनुसार  देशात प्रत्येक 100 मधील 6 ते 7 मुलांचे आजारपण जन्माशी निगडीत असते. देशात दरवर्षी 17 लाखाहून अधिक बाळांना आजारपणाचा सामना करावा लागतो.