By Election Result 2022 Live: पाच राज्यात 7 जागांवर पोटनिवडणूक, भाजप पिछाडीवर

योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाची आघाडी, डिंपल यादव यांची जोरदार मुसंडी

Updated: Dec 8, 2022, 11:31 AM IST
By Election Result 2022 Live: पाच राज्यात 7 जागांवर पोटनिवडणूक, भाजप पिछाडीवर title=

By Election Result 2022 : गुजरात (Gujrat Assembly Election) आणि हिमाचलप्रदेशमध्ये (Himachal Pradesh Assembl Election) विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच देशात पाच राज्यात सात जागांसाठी पोटनिवडणुकीचे निकालही समोर येत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 6 जागांसाठी तर उत्तरप्रदेशमधल्या हायप्रोफाईल मैनपूर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. मैनपूरी मतदारसंघात समाजवादी पार्टी (SP) आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं ऑक्टोबरमध्ये निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

विधानसभा पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशमधल्या रामपूर आणि खतौली, ओडिसातल्या पदमपूर, राजस्थानमधल्या सरदारशहर, बिहारमधल्या कुढनी आणि छत्तीसगढमधल्या भानुप्रतापपूर विधानसभा जागेसाठी मतदार पार पडलं होतं. 

मैनपूर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी समाजवादी पक्षातर्फे मुलामस सिंह यादव यांची सून आणि पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून शिवपाल सिंह यादव यांचे माजी विश्वस्त रघुराज सिंह शाक्य यांना उभं करण्यात आलं होतं. मैनपूर मतदार संघात डिंपल यादव या मोठ्या मताधिक्क्याने आघाडीवर आहेत. डिंपल यादव यांना आतापर्यंत 96,409 मतं मिळाली असून त्या 51 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर रघुराज शाक्य यांना 45,387 मतं मिळाली आहेत. 

विधानसभा पोटनिवडणूकीतही भाजप पिछाडीवर
दुसरीकडे विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजप पिछाडीवर आहे. बिहारच्या कुढनी मतदारसंघात भाजप आणि जदयूमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. छत्तीसगडमधल्या भानुप्रताप मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवार सावित्री मंडावी आतापर्यंत 5812 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवाराला 2978 मतं मिळाली आहेत. 

ओडीशातल्या पदमपुरमध्ये बीज जनता दलाचे बर्षा बरिहा भाजप उमेदवार प्रदीप पुरोहित यांच्यापेक्षा साडेतीन हजार मतांनी पुढे आहेत. तर राजस्थानच्या सरदारशहर मतदारसंघात काँग्रेसचे अनिल कुमार आघाडीवर असून भाजपचे अशोक कुमार पिछाडीवर आहेत. बिहारच्या रामपुर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आशिम राजा आघाडीवर आहेत. सुरुवातीला भाजपच्या आकाश सक्सेना यांनी बढत घेतली होती, पण काही वेळातच आशिम राजानी आघाडी घेतली.