...तर देशातील लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढणार ?

लॉकडाऊन ५ हा १५ जूनपर्यंत असण्याची शक्यता 

Updated: May 26, 2020, 08:51 PM IST
...तर देशातील लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढणार ? title=

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभुमीवर 'लॉकडाऊन ४' हा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण ही आकडेवारी काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे देशातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील कोणतेही अधिकृत विधान केंद्राकडून आले नाही. आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि ४ लॉकडाऊन पाहता लॉकडाऊन ५ हा १५ जूनपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

India lockdown amid coronavirus COVID-19 scare: Day 22 in pics ...

केंद्र आणि राज्य सरकार मिळून लॉकडाऊन ४ चे परिक्षण करत आहेत. गृह मंत्रालय देखील राज्य सरकारांसोबत ताळमेळ राखत यावर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांकडून लॉकडाऊन ४ संदर्भातील अहवाल मागितला जाणार आहे. या अहवालानंतर केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. 

लॉकडाऊनमध्ये देश रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागला गेलाय. रेड झोनमधल्या नागरिकांसाठी सवलती नसल्या तरी ग्रीन झोनमध्ये सरकारने शिथीलता दिली आहे. त्यामुळे इथे दुकान, ग्रीन झोन अंतर्गत प्रवासास मुभा आहे. देशात विमान सेवा देखील सुरु झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन ५ सुरु झालं तरी जनतेचा आत्मविश्वास कसा वाढेल ? याकडे सरकारचे लक्ष असणार आहे. 

No plan to extend 21-day lockdown to curb spread of coronavirus ...

गेल्या २४ तासामध्ये कोरोनाचे ६ हजार ५३५ प्रकरणं समोर आली तर १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजार ३८० इतका कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला आहे. तर ४ हजार १६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही गंभीर बाब आहे.

लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची अट

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र त्यानंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अट ठेवली आहे. लॉकडाऊन आपण हळू-हळू उठवत आहोत, यापुढे लॉकडाऊनमधून आणखी काय उघडत जाणार याची यादी देण्यात येईल, परंतु लॉकडाऊनबाबत एक अट असणार आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरही राज्यात आम्ही आधी बघणार, कितपत गर्दी होते, गर्दी झाली तर सुरु केलेलं सर्व पुन्हा दुर्दैवाने बंद करावं लागले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.