Car Plane Accident - सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर गंमतेशीर, भावूक आणि धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. याच सोशल मीडियावर विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ‘गो फर्स्ट' (Go First) कंपनीच्या विमान आणि कारची धडक थोडक्यात टळली आहे.
मंगळवारी (2 ऑगस्ट) दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) इंडिगो (Indigo) कंपनीच्या ‘ए320नियो' विमानाने लँडिक केलं. त्यावेळी विमानाच्या नोज व्हील म्हणजे विमानाच्या पुढच्या चाकेला कार धडकणार होती. मात्र प्रसंगावधाने दाखवल्याने विमान आणि कारची धडक थोडक्यात टळली आणि मोठा अनर्थ टळला. इंडिगो कंपनीच्या विमानचं कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली आहे.
या घटनेनंतर कारचालक नशेत असल्याचा संशय आला. म्हणून कारचालकाची एनालाइजर टेस्ट करण्यात आली. मात्र या कार चालकाची टेस्ट निगेटिव्ह आली. मंगळवारी सकाळी दिल्ली विमानतळावरून हे विमान पटाणाला जाण्यासाठी उभी असताना अचानक स्विफ्ट डिजायर नोज व्हीलजवळ येऊन थांबली. या घटनेनंतर त्वरित परिस्थिती नियंत्रणात आली आणि फ्लाइटने निर्धारित वेळेत उड्डाण भरलं.
#WATCH | A Go Ground Maruti vehicle stopped under the nose area of the Indigo aircraft VT-ITJ that was parked at Terminal T-2 IGI airport, Delhi. It was an Indigo flight 6E-2022 (Delhi–Patna) pic.twitter.com/dxhFWwb5MK
— ANI (@ANI) August 2, 2022