Import Duty on Gold: केंद्र सरकारने सोने-चांदीवर लागणारी इंपोर्ट ड्युटी (Import Duty) म्हणजेच आयात शुल्कासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) सोनं (Gold), चांदी (Silver) आणि इतर मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाने आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांवर वाढवलं आहे. यासंबंधी अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यावरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे. यामध्ये 10 टक्के बेसिक कस्टम ड्युटी (BCD) आणि 5 टक्के AIDC (अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस म्हणजेच कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर) यांचा समावेश आहे. सोशल वेलफेयर सरचार्जला (SWC) यातून वगळण्यात आलं आहे.
मंत्रालयाने मौल्यवान धातूंचा वापर करण्यात आलेल्या उत्प्रेरकांवरील आयात शुल्कातही वाढ केली आहे. सोने किंवा चांदी हा एक छोटासा घटक आहे जसे की हुक, पिन, स्क्रू जो दागिन्यांचा संपूर्ण तुकडा किंवा त्याचा काही भाग जागेवर ठेवण्यास मदत ठेवतो.
सोशल वेलफेयर सरचार्जमधून सूट देण्यासह 10 बेसिक कस्टम ड्युटी (BCD) आणि 4.35 टक्के AIDC सह शुल्क वाढवून 14.35 टक्के करण्यात आलं आहे. अधिसूचनेनुसार, नवीन दर 22 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी, जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने (GJEPC) ने सरकारला सोने तसंच कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील (CPD) आयात शुल्क कमी करण्याचा आग्रह केला आहे. GJEPC मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क सध्याच्या 15 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी करत आहे. यामध्ये सीपीडीवरील कस्टम ड्युटी सध्याच्या 5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.