मुंबई : जर तुम्हांला सरकारी नोकरी असेल आणि सोबतच कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच(पीएफ) चे सदस्य असाल तर सहाजिकच तुम्ही रिटायरमेंटसाठी प्लॅन करत असाल.
सरकारी नोकरीचं एक प्रमुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सुरक्षितता. यामुळे सहाजिकच आर्थिक सुरक्षा राहण्यास मदत होते. मग तुम्हांला रिटायर होताना नेमका किती पीएफ मिळू शकतो याचा काही स्वरूपातील अंदाज आत्ताच सह्ज लागू शकतो.
सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय हे सुमारे 58-60 आहे. त्यामुळे याकाळात आपोआपच तुम्ही किती पैसे साठवू शकता हे नक्की जाणून घ्या. कारण पीएफमध्ये तुमच्यासोबत कंपनीदेखील काही हिस्सा भरत असते.
अगदीच 'इमरजन्सी' नसेल तर सहाजिकच तुम्ही पीए कॉन्ट्रुब्युशन वाढवू शकता. यामुळे निवृत्तीनंतर किंवा गरजेच्या वेळेस अधिक आर्थिक सहाय्य मिळते.
दरमहा सॅलरी स्लीपमध्ये तुमची बेसिक सॅलरी आणि डीए दिलेला असतो. प्रत्येक कर्मचार्याच्या बेसिक सॅलरी आणि डीएच्या 12% रक्कम पीए अकाऊंटमध्ये जाते. सोबतच तुमची कंपनीदेखील 12% योगदान देते.
पीएफ खातेदाराचे वय - 25 वर्ष
निवृत्तीचं वय - 58 वर्ष
बेसिक सॅलरी - 10,000
इंटरेस्ट रेट - 8.65%
सॅलरीवर प्रतिवर्षी मिळणारा फायदा - 10%
एकूण रक्कम - 1.48 कोटी रूपये
पीएफ खातेदाराचे वय - 25 वर्ष
निवृत्तीचं वय - 58 वर्ष
बेसिक सॅलरी - 15,000
इंटरेस्ट रेट - 8.65%
सॅलरीवर प्रतिवर्षी मिळणारा फायदा - 10%
एकूण रक्कम - 2.32 कोटी रूपये