Nashik Pune Semi High Speed Rail Project : महाराष्ट्रातील पहिला पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्प मार्गी लागण्याआधीच वादात सपाडला आहे. संगनेर मार्गे पुणे नाशिक हा.स्पीड ट्रेन धावणार होती. आता मात्र, अचानक या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ झाला आहे. मार्गात बदल झाल्याने संगमनेरसह आसपासच्या जिल्ह्यातील स्थानिक आक्रमक झाले अहेत.
संगनेर मार्गे पुणे नाशिक हायस्पीड ट्रेन धावणार होती. मात्र, या रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटर वेब रडिओ टेलिस्को प्रकल्प येत असल्यामुळे या प्रकल्पाच्या रूट मध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. यामुळे या मार्गात बदल करण्यात आला. पुणे- अहिल्यानगर- शिर्डी – नाशिक या मार्गे ही हायस्पीड ट्रेन धावणार आहे. यामुळे नाशिक-सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-कळंब-मंचर-राजगुरूनगर-चाकण या भागातील स्थानिक आक्रमक झाले आहेत. संगनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग असावा अशी मागणी केली जात आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मध्य रेल्वेने महारेलकडून हा प्रकल्प काढून घेऊन GMRT चे कारण दाखवत, तसेच नाशिक-शिर्डी हा सरळ मार्ग करण्याच्या उद्देशाने शिर्डीमार्गे नेण्याचा घाट घातला आहे. परंतु नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे असा रेल्वेमार्ग अतिशय अव्यवहार्य ठरेल व पुणे-नाशिक हे अंतर कमी वेळात गाठण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल. तसेच पुणे-नाशिक मार्गावरील संगमनेरसह कोणत्याच तालुक्यांना याचा कोणताही उपयोग होणार नाही, त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. GMRT ला धक्का लागू न देता, त्यापासून १-२ किलोमीटर अंतरावरून बोगद्यामार्गे पुणे-नाशिक रेल्वेमार्ग नेण्याचा पर्याय शक्य आहे. त्यामुळे सरळमार्गानेच हा रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी आपण आग्रही आहोत. या अनुषंगाने मी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच यासाठी सर्वपक्षीय नेते, सामाजिक, आर्थिक संस्थांमध्ये काम करणारे लोक यांची कृती समिती स्थापन करण्यासाठी देखील पुढाकार घेणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हंटले आहे.
केंद्राचे कारण पुढे करून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.हा रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत कृती समिती स्थापन करावी,असे मी सर्वांना आवाहन करतो. पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या उज्वल भवितव्यासाठी हा रेल्वे प्रकल्प पुणे - मंचर - नारायणगाव - संगमनेर - सिन्नर - नाशिक याच मार्गाने झाला पाहिजे, ही माझ्यासह सर्वांचीच भावना आहे. आपल्या भावनांना डावलून दुसऱ्या मार्गाने हा प्रकल्प आपल्यावर लादला जात असेल तर याच्या विरोधात पक्षीय मतभेद विसरून आपण एकत्र आलं पाहिजे असं आवाहनही आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.