Meta Apologized to India : मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी गेल्या शुक्रवारी 10 जानेवारी 2025 ला एका पॉडकास्टमध्ये भारत सरकारविरोधात धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर भारतात मार्क झकरबर्ग विरोधात संतापाची लाट पसरली होती. मेटावाल्यांना भारत सरकारची माफी मागावी असं भाजप खासदार आणि कम्युनिकेशन-माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हटलं होतं. त्यानंतर मार्क झकरबर्ग यांच्या त्या एका वक्तव्यामुळे Meta अखेर मोदी सरकारची माफी मागावी लागली.
फेसबुकची मूळ कंपनी मेटाने माफी मागताना त्यांनी लिहिलंय की, भारत हा मेटासाठी महत्त्वाचा देश आहे. नकळत झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागू इच्छितो.
मार्क झकरबर्ग त्या मुलाखतीत म्हणाले होती की, कोरोना-19 नंतर जगभरातील सरकारवरील लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. यामुळे ते हरले. या वक्तव्यात भारताचाही उल्लेख मार्क यांनी केला होता. त्यावर भारताकडून तीव्र आक्षेप व्यक्त करण्यात आला.
गेल्या वर्षात जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घटना घडल्या. त्यात महागाई, कोरोनामुळ निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेक देशांतील सत्ताधारी पक्षाला सामना करावा लागला. भारतासह जगभरातील विविध देशांतील सरकारांनी कोरोनाकाळात राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणांमुळे आणि त्यादरम्यान घडलेल्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम लोकांची नाराजी आणि संताप निवडणूक निकालांत दिसून आला. जगभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या त्या ठिकाणी सत्तेतील सर्व लोक हरले .नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही निवडणुकीत हरले, असं विधान झकरबर्गनं केलंय.
मेरी कमिटि इस ग़लत जानकारी के लिए @Meta को बुलाएगी । किसी भी लोकतांत्रिक देश की ग़लत जानकारी देश की छवि को धूमिल करती है । इस गलती के लिए भारतीय संसद से तथा यहाँ की जनता से उस संस्था को माफ़ी माँगनी पड़ेगी https://t.co/HulRl1LF4z
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) January 14, 2025
त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क झकरबर्गच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत त्यांचे विधान 'तथ्यत: चुकीचे' असल्याचं म्हटलं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली होती
तर अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'भारतातील जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. 2024 मध्ये भारतात निवडणूक पार पडली ज्यामध्ये तब्बल 64 कोटी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास दाखवला. त्यामुळे 2024 मध्ये भारतासह बहुतांश विद्यमान सरकारे कोविडमुळे पराभूत झाली हा मार्क झुकरबर्गचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचा आहे.'