दोन बायका, तिसरीसोबत अफेअर; पत्नीला आला संशय, GPS लावला अन् केला पाठलाग, हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं अन् नंतर...

Ujjain Sarpanch Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनच्या (Ujjain) नीमच जिल्ह्यातील सरपंचाला त्याच्या दुसऱ्या पत्नीने हॉटेलबाहेर रंगेहाथ पकडलं. यानंतर तिने रस्त्यातच मारहाण सुरु केली. ही घटना सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2025, 08:07 PM IST
दोन बायका, तिसरीसोबत अफेअर; पत्नीला आला संशय, GPS लावला अन् केला पाठलाग, हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं अन् नंतर... title=

Ujjain Viral Video: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका महिलेने आपल्या पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडलं आहे. महिलेने हॉटेलच्या बाहेरच पतीला प्रेयसीसह पकडलं आणि मारहाण सुरु केली. पतीने आपल्या प्रेयसीसह वेळ घालवण्यासाठी तब्बल 210 किमी प्रवास केला होता. पण आपल्या पत्नीचं आपल्या सर्व हालचालींवर लक्ष असल्याचं पतीला अजिबात नव्हतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सरपंचने दोन लग्न केलं असून, ही त्याची दुसरी पत्नी आहे. त्याचे एका अंगणवाडी सेविकेशी संबंध होते. 

रिपोर्टनुसार, पती अज्ञात महिलेशी वारंवार संवाद साधत असल्याने महिलेला संशय आला होता. यानंतर तिने पतीच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. तिने आपल्यी पतीच्या कारमध्ये जीपीएस लावलं होतं. हे लोकेशन ट्रेस करुन ती उज्जैनला पोहोचली होती. नीमच ते उज्जैन प्रवास केल्यानंतर ती हॉटेलच्या बाहेर वाट पाहत थांबली होती. जेव्हा सरपंच पती आणि प्रेयसी हॉटेलच्या बाहेर येऊन कारमध्ये बसू लागले तेव्हाच तिने कुटुंबासह त्यांना रंगेहाथ पकडलं. 

नीमच जिल्ह्याचील सावन ग्रामपंचायतीचा सरपंच जितेंद्र माली आपल्या 45 वर्षीय प्रेयसी जी अंगणवाडी सेविका आहे तिच्यासह उज्जैनला आला होता. तो येथे महामृत्यूंजर द्वारजवळील समीप हॉटेलमध्ये थांबला होता. व्हिडीओत पत्नी दोघांनाही जाब विचारत गोंधळ घालताना दिसत आहे. यानंतर तिथे बघ्यांचीही गर्दी झाली होती. सरपंचासह असणारी महिला तिला तू कोण आहेस असं विचारते, त्यावर ती 'मी तुला पोलीस स्टेशनमध्ये सांगते' असं उत्तर देते. महिलेसह असणाऱ्या इतर कुटुंबीयांनी मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओत तिला बेदम मारहाण होताना दिसत आहे. 

जितेंद्र माळी याची ही दुसरी पत्नी आहे. पहिले लग्न दोन दशकांपूर्वी झाले होते, परंतु ते लग्न टिकले नाही. नंतर त्याने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना चार मुलं आहेत. आता तिसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा असल्याने आपल्यावर मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. 

स्थानिक पोलीस अधिकारी नरेंद्र यादव यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे. नानाखेडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूचे लोक पोहोचले होते. पण त्यांनी तक्रार देण्यास नंतर नकार दिला. पण जर पत्नीने तक्रार दिली तर कारवाई करु असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.