पेइचिंग : चीनचे नवे हयपरसॉनिक बॅलेस्टीक मिसाईल हे केवळ अमेरिकाच नव्हे तर, जपान आणि भारतासाठीही धेकेदायक असल्याचे पुढे येत आहे.
टोकियातील द डिप्लोमॅटीक मॅग्झिन इन चायनाने गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात चीनने मिसाईलची चाचणी केल्याबाबतचे एक वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'मध्ये मंगळवारी एक रिपोर्ट आला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांचा हवाला देत, 'द डिप्लोमेट'ने गेल्या महिन्यातील वृत्तत म्हटले होते की, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) रॉकेट फोर्सने 1 नोव्हेंबर आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी मिसाईल टेस्ट केल्या होत्या. दोन्हीही परिक्षणे यशस्वी झाली आणि DF-17 2020 च्या समारास ही दोन्ही मिसाईल सेवेत दाखलही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मंगळवारी याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला. तसेच, या माहितीसाठी आपण चीनच्या सुरक्षा मंत्रालयाशी संपर्क साधावा असाही सल्ला प्रसारमाध्यमांना दिला. मात्र, चीनच्या या धोरणामुळे अमेरिका, भारत आणि जपानलाही धोका असल्याची भीती सूरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.