गांधीनगर : काँग्रेसने लोकसभा निडवणुकीच्या प्रचाराचा नारळ गुजरातमधून फोडला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मोदींनी छोट्या शेतकर्याला देशोधडीला लावले, असा घणाघात केला. त्याचवेळी त्यांनी देशात काँग्रेचे सरकार सत्तेवर आले तर जीएसटी कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी राफेल विमानाचा मुद्दा मांडला. उद्योगपती अनिल अंबानी कागदाचेही विमान बनवू शकत नाहीत ते राफेल कसे बनविणार? राफेल प्रकरणात तीस हजार कोटींचा फायदा मोदींनी अंबानींना करून दिला, असा थेट आरोप केला.
Congress President Rahul Gandhi in Gandhinagar, Gujarat: The result (of #LokSabhaElections2019) will be very good in Gujarat as well as at the national level. There is anger among people. Government has failed completely in providing employment to the youth of the country. pic.twitter.com/CBND2y7tP9
— ANI (@ANI) March 12, 2019
Gujarat: Congress President Rahul Gandhi, General Secretary UP-East Priyanka Gandhi Vadra and Sonia Gandhi arrive at Ahmedabad for Congress Working Committee (CWC) meeting. pic.twitter.com/Fgew4zDJYN
— ANI (@ANI) March 12, 2019
महात्मा गांधींचा विचार ही देशाची ओळख खरी ओळख आहे. ही ओळख फुसण्याचे काम करण्यात येत आहे. भारताला हवा असलेला दहशतवादी मसूद अझहरला भाजपनेच पाकिस्तानात पाठवले असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. मोदी हे सगळ्याच आघाडीवर अपयशी ठरले आहेत. शेतकऱ्यांचं कर्ज असेल, बेरोजगारी असेल एकाही प्रश्नावर हे सरकार यशस्वी ठरलेले नाही. नोटाबंदीचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला तोही त्यांच्या चुकीच्या निर्णयांपैकीच एक निर्णय होता. कारण या निर्णयामुळे सामान्य उद्योजकांचा कणाच मोडला, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.
Congress President Rahul Gandhi in Gandhinagar, Gujarat: After years, CWC meeting has taken place in Gujarat. We conducted the meeting here, because there's fight between two ideologies in the country & in Gujarat you will find both the ideologies. pic.twitter.com/pnAdCDola1
— ANI (@ANI) March 12, 2019
मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवलेला नाही. पंधरा लाख देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तेही त्यांनी पाळले नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी म्हटले होते, मला पंतप्रधान बनवू नका मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे, मात्र चौकीदार चोर आहे हेच पाच वर्षांत उघड झाले आहे, असे राहु गांधी म्हणालेत.