चेन्नई: संपूर्ण देशभरात उन्हाचा पारा चढल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच वर्ध्यात झालेल्या सभेत याचा प्रत्यय आला होता. मात्र, भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावूनही सभेचे मैदान अर्धेही भरले नव्हते. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पेटले होते. या वादाचा धुरळा खाली नाही बसत तोच आता सोशल मीडियावर एक नवा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत काँग्रेसचे कार्यकर्ते पत्रकारांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील आहे. याठिकाणी काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यावेळी काही छायाचित्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढत होते. ही गोष्ट न रुचल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या छायाचित्रकारांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रसंगामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.
#WATCH Tamil Nadu: Congress workers manhandle and thrash photojournalists who were allegedly clicking pictures of empty chairs at a public rally by the party in Virudhunagar. (06.04.2019) pic.twitter.com/epTiD9iLtK
— ANI (@ANI) April 7, 2019
काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या नागपूरमध्ये झालेल्या सभेतील गर्दीवरूनही असाच वाद निर्माण झाला होता. काही काँग्रेस नेत्यांनी नागपूरमधील सभेचे फोटो ट्विट केले होते. मात्र, हे फोटो बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.