नवी दिल्ली : कोरोना लसीकरण अंतिम टप्प्यात असून पुढच्या वर्षाच्या सुरुवातील लस देण्यास सुरुवात होऊ शकते. राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येतंय. देशात कोरोना लसीकरण ऐच्छिक असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.
कोविड १९ लशीची कुणावर सक्ती केली जाणार नाही. ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण दोन मात्रा घेतल्या जाव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीचे करोनापासून संरक्षण होईल. इतरांनाही त्याची बाधा होणार नाही असे देखील स्पष्ट करण्यात आलंय.
केरळ (Kerala) चे मुख्यमंत्री पिनरायी विजयन (Pinarayi Vijayan) राज्यात कोरोना वॅक्सिन (Corona vaccine) मोफत देण्याची घोषणा केलीय. केरळमध्ये लसीकरण मोफत होईल, यासाठी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. याआधी मध्य प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसहीत राज्यांनी मोफत वॅक्सिनची घोषणा केलीय.